Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर शोककळा; तरुण लेखकाचे अपघाती निधन, सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट
Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आपल्या विनोदाने खळखळून हसवणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कार्यक्रमाच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती लेखन टीममधील लेखक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. (Maharashtrachi Hasyajatra)
सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये विजय कुमार राख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना त्यांच्या लेखनशैलीचेही कौतुक केले. “हास्यजत्रेच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे रात्री एका अपघातात निधन झाले,” अशी माहिती त्यांनी दिली. (Maharashtrachi Hasyajatra)
ग्रामीण जीवनाचे बारकावे टिपणारा लेखक
विजय कुमार राख हे मराठवाड्यातील होतकरू लेखक होते. त्यांना विनोदाची उत्तम जाण होती, तसेच ग्रामीण जीवनातील बारकावे आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडण्याची हातोटी होती, असे सचिन गोस्वामी यांनी नमूद केले. (Maharashtrachi Hasyajatra)
ऐन तारुण्यात त्यांचे निधन होणे हा कलाक्षेत्रासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीम आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी मोठा धक्का असल्याचेही गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. या दुःखाच्या प्रसंगी हास्यजत्रा टीम त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत त्यांनी विजय कुमार राख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. (Maharashtrachi Hasyajatra)
सचिन गोस्वामी यांच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार, लेखक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत विजय कुमार राख यांना श्रद्धांजली वाहिली. (Maharashtrachi Hasyajatra)
‘हास्यजत्रे’च्या यशात पडद्यामागच्या कलाकारांचेही योगदान
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून, या कार्यक्रमातील कलाकार आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. मात्र, पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांइतकेच पडद्यामागील लेखक आणि सृजन टीमचे योगदानही महत्त्वाचे आहे. (Maharashtrachi Hasyajatra)
या कार्यक्रमासाठी सचिन गोस्वामी आणि अरविंद जगताप यांच्यासह अनेक लेखकांची टीम काम करते. याच सृजन टीमचा भाग म्हणून विजय कुमार राख हे विनोदी लेखनाची जबाबदारी सांभाळत होते. विजय कुमार राख यांच्या अचानक जाण्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सहकाऱ्यांसह मराठी मनोरंजन क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे. (Maharashtrachi Hasyajatra)





