Pune News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळी फीत बांधून आंदोलन; उच्च न्यायालयाप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची मागणी
Pune News : मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासह पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १६) काळी फीत लावून आंदोलन केले.

Pune News : मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासह पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १६) काळी फीत लावून आंदोलन केले. (Pune News)
‘समान काम, समान वेतन’ या संवैधानिक व न्याय तत्त्वाच्या आधारे ही मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य न्यायिक लघुलेखक संघटना, पुणे जिल्हा बेलिफ संघ, पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना आणि पुणे जिल्हा न्यायालयीन चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना या चारही संघटनांनी संयुक्तपणे आंदोलनाची भूमिका घेतली आहे. (Pune News)
या मागणी संदर्भातील प्रस्ताव दीर्घकाळापासून शासन दरबारी प्रलंबित असून, वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर सकारात्मक निर्णय झालेला नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. (Pune News)
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने यापूर्वी दिलेला आंदोलनाचा इशारा व संपाची नोटीस पुन्हा शासन आणि उच्च न्यायालय प्रशासनास दिली आहे. (Pune News)
त्यानुसार आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी (दि.१६) सकाळी ९.३० वाजता शिवाजीनगर न्यायालयासह जिल्ह्यातील संबंधित न्यायालयांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून शांततापूर्ण व शिस्तबद्ध आंदोलन केले. (Pune News)
लघुलेखक, लिपिक वर्गीय कर्मचारी, बेलिफ, चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनानंतर निर्धारित कार्यालयीन वेळेत कर्मचारी आपापल्या कक्षात उपस्थित राहून न्यायालयीन व प्रशासकीय कामकाजात सहभागी झाले. (Pune News)
न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज केवळ काळी फीत बांधुन आंदोलन केले. मात्र, त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर हे कर्मचारी संपावर जातील. त्यावेळी पक्षकार आणि वकिलांची गैरसोय होणार आहेत. याचा विचार करून शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.
ॲड. राकेश सोनार, शिवाजीनगर व उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील





