फरहान अख्तरच्या ‘120 बहादुर’ची झलक समोर; मोशन पोस्टर रिलीज

Farhan Akhtar New Film | अभिनेता फरहान अख्तरने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची झलक देखील त्याने दाखवली आहे. या चित्रपटाचे नाव आणि यातील फरहान अख्तरच्या भूमिकेबाबत यात माहिती देण्यात आली आहे.
फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘120 बहादुर’ असे आहे. जो 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित असेल. या सिनेमाचं मोशन पोस्टर आज रिलीज झालं. या पोस्टरमध्ये पहिल्यांदा आर्मीच्या गणवेशात फरहान पाहायला मिळतो. आणखी एका पोस्टरमध्ये फरहानच्या चेहऱ्याची झलक दिसत असून त्याच्या भूमिकेचा उलगडा होता. फरहान या सिनेमात वीरचक्र सन्मानित मेजर शैतान सिंग पीव्हीसी यांची भूमिका साकारणार आहे. फरहान या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
त्याने चित्रपटाच्या पोस्टर्सची एक झलक दाखवली आहे, ज्यामध्ये अभिनेता सैन्याच्या गणवेशात बर्फाच्छादित डोंगरावर पाठ करून उभा आहे. ‘120 बहादूर’चे पोस्टर शेअर करताना फरहान अख्तरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “त्यांनी जे मिळवले ते कधीही विसरता येणार नाही. परमवीर चक्र पुरस्कार विजेते मेजर शैतान सिंग आणि चार्ली कंपनी, १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या सैनिकांची कहाणी मी तुमच्यासमोर सादर करत आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे.’ Farhan Akhtar New Film |
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, ‘भारत-चीन युद्धादरम्यान 18 नोव्हेंबर 1962 रोजी लढलेली रेझांगलाची प्रसिद्ध लढाई ही आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची, धैर्याची आणि निस्वार्थीपणाची कहाणी आहे. शौर्याची ही अद्भुत गाथा आपल्यापर्यंत मी पोहचवत आहे, याबद्दल मला आनंद होत आहे. स्क्रीनवर ही कहाणी समोर आणण्यासाठी भारतीय सैन्याचे समर्थन आणि पूर्ण सहकार्य मिळाले.’
दरम्यान, रजनीश घई या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून एक्सेल एंटरटेनमेंट बॅनरखाली ‘120 बहादूर’ची निर्मिती केली जाणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या भूमिकेत फरहान अख्तरला पाहण्यासाठी चाहते देखील आतुर आहेत. Farhan Akhtar New Film |
हेही वाचा:





