ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकला नव्हता. संघाला सुपर-१२ मध्ये नेट रनरेटमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संघाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर राहणार असल्याचे समोर आले आहे. मॅक्सवेल वाढदिवसाच्या पार्टीला गेला असताना त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पायाला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने तो किती दिवस क्रिकेटपासून लांब राहील, याबाबत मात्र कोणतीही माहिती नाही.
“परदेशी लीगमध्ये खेळून कौशल्य वाढवावे”,चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकाचा भारतीय खेळाडूंना सल्ला
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell ) दुखापतीबाबत माहितीनुसार, मॅक्सवेल वाढदिवस पार्टीसाठी मेलबर्नमध्ये होता आणि याच दरम्यान त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला असून तो संपूर्ण उन्हाळ्याच्या हंगामातून मैदानाबाहेर जाऊ शकतो.
माहितीप्रमाणे ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) हा वाढदिवस साजरा करत असलेल्या व्यक्तीसोबत घराच्या अंगणात धावत होता. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो घसरून पडला. यामध्ये त्याच्या पायाला फॅक्चर झाला आहे. त्याची ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तो आता मैदानात कधी खेळताना दिसणार याबाबत कोणतीही माहिती नाही.
ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) त्याच्या दुखापतीमुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. याशिवाय तो संपूर्ण बीबीएल स्पर्धेमधूनही बाहेर राहण्याचीशक्यता आहे. अशात त्याच्या दुखापतीतून तो कधी बरा होईल हे येत्या आठवडाभरातच कळेल. मॅक्सवेल भारत दौऱ्यावर फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपर्यंत तंदुरुस्त राहू शकेल का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मॅक्सवेलच्या दुखापतीबाबत संघाचे राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले की, ‘हा एक अतिशय दुर्दैवी अपघात होता आणि आम्हाला मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell ) दुखापतीबद्दल चिंता वाटते. गेल्या काही सामन्यांत तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. तो आमच्या संघातील मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. त्याला दुखापतीतून सावरण्याचा आणि लवकर बरा होण्यास आम्ही पाठिंबा देत राहू.”