Sanjay Raut : ‘चंद्रकांत पाटलांना नोबेल द्या’ राऊतांचा खोचक टोला; सुषमा अंधारे म्हणाल्या “तरी बरं हे भाजपसोबतच सत्तेमध्ये…”
Sanjay Raut : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पाटलांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत त्यांना नोबेल पुरस्कार द्या अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Sanjay Raut : नुकतेच उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील पोलिसांनी तयार केलेल्या रिपोर्ट प्रकरणी एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन राजकारण तापलं असून, उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पाटलांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत त्यांना नोबेल पुरस्कार द्या अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
“चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्यांच्यात विज्ञान विषय येतो. चंद्रकांत पाटील यांनी जे एक नवीन संसोधन केलं आहे की दगडावरील ठसे घेऊन आधार कार्डला लिंक केले जातील, या शोधाबद्दल फडणवीसांनी नोबेल पुरस्कार समितीला शिफारस करावी की चंद्रकांत पाटील यांना विज्ञान व संशोधन नोबेल पुरस्कार द्यायला हवा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut)
निलकेणी दोन दिवस कोमात गेले आहेत. त्यांना… (Sanjay Raut)
“दगडावरील ठसे आधार कार्डशी लिंक करायचे, हा नवीन शोध ऐकून ज्यांनी आधार कार्ड निर्माण केलं ते नंदन निलकेणी दोन दिवस कोमात गेले आहेत. त्यांना काय करावं हे सुचत नाही आहे. मला कसं नाही समजलं असं त्यांना वाटत आहे,” अशा खोचक शब्दांत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
… तरी बरं हे भाजपसोबतच सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाच्या माजी आमदाराने ठणकावले… इतर कोणी बोलले असते तर लगेच त्याला पाकिस्तानी किंवा नक्षलवादाचा पाठीराखा किंवा भाड्याचे टट्टू असे म्हणत फडणवीस यांनी पुन्हा आकाशपातळ एक केले असते.
…बाकी रवीभाऊ राजकारण चालत राहील पण… https://t.co/5AFggPyFGx— SushmaTai Andhare (@andharesushama) July 31, 2026
अमित शाहांवर गंभीर आरोप (Sanjay Raut)
१ अॅागस्ट या दिवशी केंद्रीय अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यात येणार आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य करत थेट अमित शाहांवर गंभीर आरोप केला. “पुणेकर विरोध करणार असून त्यांचं अभिनंदन करतो. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असून ही साम्राज्यशाही आहे. अमित शाह यांचे हात रक्ताने बरबटले आहेत, त्यांच्या अंगावर रक्ताचे, अश्रूचे शिंतोडे पडले आहेत आणि महान जहाल लोकमान्य टिळकांच्या नावे असलेला पुरस्कार त्यांच्या हाते देण्याचा घाट घातला आहे.”
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
उबाठा गटाच्या नेत्या सुषामा अंधारेंनी देखील चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी शिंदेसेनेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलेली पोस्ट त्यांच्या ट्वीटवर अकाऊंटवरुन रिशेअर करत म्हटलं “तरी बरं हे भाजपसोबतच सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाच्या माजी आमदाराने ठणकावले… इतर कोणी बोलले असते तर लगेच त्याला पाकिस्तानी किंवा नक्षलवादाचा पाठीराखा किंवा भाड्याचे टट्टू असे म्हणत फडणवीस यांनी पुन्हा आकाशपातळ एक केले असते. …बाकी रवीभाऊ राजकारण चालत राहील पण विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर आपण एकजुटीने लढू…
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
“दिल्ली पोलिसांनी मोठा रिपोर्ट तयार केला आहे. तो पाहिला तर चक्कर येईल. ज्यांना पकडलं ते कोणत्या गुन्ह्यात होते त्याचे पोलिसांनी विश्लेषण केलं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, तिथे पडलेला प्रत्येक दगड उचललेला आहे. त्या दगडावर असणारे फूटप्रिंट आधारशी लिंक होतील.”
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट





