Jarange Patil on Vijay Wadettiwar | ओबीसी समाजासाठी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी समाजातील मंत्री आमदार उपस्थितीत होते. याशिवाय विरोधी पक्षातील काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना देखील बैठकीला आमंत्रित केलं होतं. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाच्या विरोध बोलणाऱ्यांना विरोध करा, असे जर मनोज जरांगे यांचे म्हणणे असेल तर मनोज जरांगे यांच्या हातात AK-47 द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा. म्हणजे आता आम्ही आमच्या आरक्षणाचे पण रक्षण करायचे नाही का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाजातील बाकीच्यांनी जगायचं की नाही हे जरांगे पाटलांनी सांगून टाकावं, की तुमच्या ताकदीच्या बरोबर सगळ्यांना बाकीच्या सगळ्या समाजांवर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही. तरीही मनोज जरांगे यांना द्यायचेच असेल तर बंदूक आणि तलवारी द्या, छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुंडके, म्हणजे जरांगे पाटलांचा समाधान होईल, अशी प्रतिक्रिया हि विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. Jarange Patil on Vijay Wadettiwar | राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या दबावात ओबीसी समाजाचा गळा घोटात आहे. सरकारने काल बोलावलेल्या बैठकीत आम्हाला अपेक्षा होती कि, ओबीसीवर अन्याय करणारा जीआर सरकार रद्द करेल. त्याबरोबर इतर काही मागण्या होत्या, परंतु ओबीसी समाजावर 2 ऑक्टोबरचा जीआर असंवेधानिक आहे आणि तो ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे तो रद्द करावा, अशी सगळ्यांची प्रमुख मागणी होती. यामध्ये ओबीसी समाजाचे 50 प्रतिनिधी होते आणि सर्वांची एकमुखाने हीच मागणी होती. Jarange Patil on Vijay Wadettiwar | शासनाचा जीअर महाराष्ट्रातील 374 जातींवर अन्याय करणारा “शासनाचा जीअर महाराष्ट्रातील 374 जातींवर अन्याय करणारा आहे, हे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही 10 ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहोत. या जीआर मध्यला पात्र शब्द सुद्धा वगळावा. पहिल्यांदा पात्र हा शब्द नव्हता, नंतरच्या एक तासात जीआरमध्ये पात्र शब्द टाकला आहे आणि ऑनलाईन सिग्नेचर घेतलेला आहे. हा सगळा निर्णय दबावात झालेला आहे, एखादा प्रस्थापित समाज ज्याच्याकडे सगळं काही आहे. सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्या आहे, यात जर काही गरीब लोक असलेले त्याच्यासाठी ईडब्ल्यूएसची व्यवस्था आहे. त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्या, अशी मागणी चुकीची आहे,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे. Jarange Patil on Vijay Wadettiwar | हेही वाचा: अभिनेत्री सोहा अली खानने साजरा केला 47 वा वाढदिवस; सोशल मीडियावर खास फोटो केले शेअर