अभिनेत्री सोहा अली खानने साजरा केला 47 वा वाढदिवस; सोशल मीडियावर खास फोटो केले शेअर

Soha Ali Khan : प्रसिद्ध बॅालिवूड अभिनेत्री सोहा अली खान हिने तिचा ४७ वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतील फोटो सोहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट्स करत सोहाला शुभेच्छा देत आहेत.
आज, रविवार, ५ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री सोहा अली खानने तिच्या वाढदिवसाचे खास फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तिने वाढदिवस साजरा केला. छोटेखानी पार्टीत सोहाची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सोहाचा पती कुणाल खेमू, बहीण सबा, मुलगी इनाया, नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्यासह इतरांसोबतचे फोटोही सोहाने पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
यासोबतच सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘केक, शांती आणि भरपूर प्रेम – #happybirthday #कृतज्ञता यापेक्षा जास्त काय मागता येईल.’ असे कॅप्शन दिले. सोहाची बहीण सबानेही तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. तिने पोस्टमध्ये सोहाला “बेबी” संबोधले आहे.
माझ्या गोड, अभिमानी आणि कधीकधी निराश न करणारी सोहा वाढदिवसाच्या शुभेच्छा! खूप खूप प्रेम. सर्व जुन्या आणि नवीन क्षणांना. असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. सोहाने 2004 मध्ये “दिल मांगे मोर” या सिनेमातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने “रंग दे बसंती”, “शादी नंबर 1”, “खोया खोया चांद”, “मुंबई मेरी जान”, “तुम मिले”, “साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स: वन्स गंगा” यांसारख्या सिनेमातून उत्कृष्ट अभिनय केला.
हेही वाचा : अभिनेता पंकज त्रिपाठीचा हटके अंदाज; रणवीर सिंग म्हणाला ‘हे काय गुरुजी?…’





