जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या 10वी निकालात मुलींचा वरचष्मा; इंदापूर तालुक्यात प्रथम

इंदापूर : लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, पहिल्या पाच क्रमांकांवर मुलींनीच बाजी मारली. ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते आणि मृण्मयी अतुल शिंदे यांनी प्रत्येकी ९८% गुण मिळवत तालुक्यात प्रथम स्थान मिळवले. याशिवाय, ज्ञानेश्वरीने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान संपादन केला.
संस्थेने सलग पाचव्या वर्षी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली. यंदा १०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, सहसचिव पौर्णिमा खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले, प्राचार्य गणेश पवार, प्राचार्य राजेंद्र सरगर, प्राचार्य सम्राट खेडकर आणि मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणानुक्रम –
१. ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते – ९८.००%
१. मृण्मयी अतुल शिंदे – ९८.००%
२. श्रावण अनिल जाधव – ९७.६०%
३. दुर्वा दादासाहेब जाधव – ९६.६०%
४. प्रतीक्षा शशिकांत ढोले – ९६.२०%
५. संस्कृती नवनाथ ढोले – ९६.००%





