‘देशात पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले जातात, पण राहुल गांधी…’ ; गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल

Giriraj Singh On Rahul Gandhi । “देशात सध्या सगळीकडेच पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले जात आहेत, मात्र यावर राहुल गांधी काहीच बोलत नाहीत,” असे म्हणत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आज काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला. “देशात अनेक ठिकाणी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले जातात, मात्र राहुल गांधी आणि सर्व विरोधी नेत्यांनी यावर मौन बाळगले आहे.” देशात हिंदूंवर अन्याय होत आहे, पण राहुल गांधी यावर काहीच बोलत नाहीत. मला वाटतं, हरवलेल्या व्यक्तीची शोध अशी सूचना त्यांच्यासाठी चिकटवायला लागणार आहे, असे सिंह यांनी म्हटले.
काय म्हणाले गिरीराज सिंह? Giriraj Singh On Rahul Gandhi ।
गिरीराज सिंह म्हणाले की, “देशात हिंदूंवर अन्याय होत आहे, मात्र देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत दिसत नाहीत. वास्तविक, मोहरमच्या आधी रविवारी बिहारच्या नवादा येथे मिरवणुकीत पॅलेस्टाईनचा ध्वज फडकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली.
घटनेचा तपास सुरू केलाय
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना बिहारच्या पाकीबारनवाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) महेश चौधरी म्हणाले की, राज्य पोलिसांनी जिल्ह्यातील धमौल भागात घडलेल्या घटनेचा तपास सुरू केला आहे. महेश चौधरी म्हणाले, “तत्काळ तपास सुरू करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे, मिरवणुकीदरम्यान झेंडा फडकावल्याबद्दल तिघांना अटक करण्यात आली. आवश्यक परवानगी न घेता मिरवणूक काढण्यात आली. तसेच तो झेंडा तत्काळ जप्त केल्याचे सांगितले. बिहार पोलिसांनी १३ जुलै रोजी दरभंगा जिल्ह्यात मिरवणुकीत पॅलेस्टिनी ध्वज फडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा
“तीनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना शासकीय लाभापासून वंचित ठेवावे” ; ‘या’ भाजप नेत्याची मागणी





