जॉर्जिया एंड्रियानी आता दिसणार वकिलाच्या भूमिकेत

इटालियन अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी लवकरच बॉलीवूड मध्ये श्रेयस तळपदे सोबत “वेलकम टु बजरंगपूर” मध्ये पदार्पण करणार आहे. या आधी जॉर्जियाने तामिळ वेब सिरीज “केरोलिना कामाक्षी” मध्ये इटालियन एजन्टची भूमिका करून सर्वांना तिच्या अभिनयाची पारख करून दिली आहे, आणि आता लवकरच इटालियन ब्युटी जॉर्जिया आपल्याला नव्या अंदाजात नवीन भूमिकेत दिसणार आहे.
बॉलीवूड आणि कोलिवूड नंतर जॉर्जिया आता, “व्हिक्टिम” नावाच्या शॉर्ट फिल्म मध्ये एका वकिलाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचे पात्र एका वकीलाचे असून काही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचे प्रीमियर असतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमन के जंगवाल यांनी केले आहे, विनिल गुप्ता निर्मित आणि कास्टिंग मनीष शुक्ला यांनी एकत्र केले होते.
दक्षिण क्षेत्रीय वेब सीरिज ‘करोलिन कामाक्षी’ मधील इंडो-फ्रेंच एजंट म्हणून जॉर्जिया एंड्रियानी यांनी सर्वांना प्रभावित केले. तिचा बॉलिवूड डेब्यू ‘वेलकम टू बजरंगपूर’ गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याशिवाय अरबाज खान आणि प्रिया वॅरियर अभिनीत बहुप्रतिक्षित “श्रीदेवी बंगलो” मध्ये आयटम नंबरसह ती तिच्या नृत्या चा जलवा पेश करणार आहे. ह जॉर्जिया एंड्रियानी बॉलिवूडमध्ये एक अद्भुत प्रवास करायला तयार आहे.





