तूप, लोणी, आईसक्रीम स्वस्त; जीएसटी कपातीनंतर ‘अमूल’चा ग्राहकांना मोठा दिलासा

Amul Price | केंद्र सरकारने जीएसटी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. यानंतर आता प्रसिद्ध डेअरी कंपनी अमूलने आपल्या ७०० हून अधिक उत्पादनांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह देशभरात अमूलच्या विविध उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता अमूलचे काही उत्पादने ग्राहकांना कमी दरात मिळणार आहे.
येत्या २२ सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. यामध्ये तूप, चीज, बटर, बेकरी प्रॉडक्ट्स, आईस्क्रीम यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. शनिवारी रात्री गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) कडून ७०० पेक्षा जास्त वस्तू स्वस्त केल्याचं जाहीर केले.
अमूलने तूप, दूध, आइसक्रीम, चीज, पनीर, चॉकलेट्स, बेकरी उत्पादने, फ्रोझन डेअरी आणि बटाट्याचे स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क, पीअनट स्प्रेड, माल्ट-आधारित ड्रिंक यांसारख्या विविध उत्पादनाच्या किंमती कपात केल्या आहेत. दर कमी केलेल्या उत्पादनाची यादी अमूलने जाहीर केली आहे. Amul Price |
जाणून घ्या नवे दर…
त्यानुसार, अमूलने तूप प्रति लीटर ४० रूपयांनी स्वस्त केले आहे. आता १ लिटर तूप ६५० वरून ६१० रुपयांना तर १०० ग्रॅम लोणी ६२ रुपयांवरून ५८ रुपयांना मिळणार आहे. अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉकची किंमत ३० रूपयांनी कपात झाली आहे. आता एक किलो अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉक ५४५ रूपयांना मिळणार आहे. फ्रोझन पनीरची किमतही कपात करण्यात आली आहे. Amul Price |
दरम्यान, केंद्र सरकारने काही वस्तू १८ टक्के स्लॅबमधून थेट ५ टक्के स्लॅबमध्ये वळवल्या आहेत. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार अमूलनेही आपल्या उत्पादनाच्या किंमतीत घट केली आहे. ज्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे.
हेही वाचा:





