Sharad Pawar | अकोला जिल्ह्यातील ३४ वर्षीय अविवाहित तरुणाने लग्न होत नसल्याने पत्नी मिळवून देण्याची मागणी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. ‘मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही’, असं या पत्रात तरुणाने लिहिलं आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील मुलांच्या गंभीर समस्याचा मुद्दा समोर आला आहे. अकोल्यात शनिवारी शरद पवार यांनी शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर त्यांनी शेतकरी, नागरिक व तरुणांकडून पत्र व निवेदने देखील स्वीकारली. यामध्ये शरद पवार यांना प्राप्त झालेल्या निवेदनात एका तरुणीने केलेल्या मागणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पत्रात नेमकं काय? नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना त्याने सांगितले की, “मी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून माझे वय ३४ वर्षे पूर्ण झाले आहे. दिवसेंदिवस वय वाढत असून भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन, ही भीती मनात घर करून बसली आहे. माझ्या जीवनाचा विचार करून मला नविन साथीदार मिळवून द्यावा.” Sharad Pawar | पुढे त्याने लिहिले, “मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी विसरणार नाही.” Sharad Pawar | ग्रामीण भागातील तरुणांचे भीषण वास्तव समोर या पत्रामुळे सोशल मीडियावर अनेकांनी या तरुणाच्या प्रामाणिकपणाचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे. यातून ग्रामीण भागातील तरुणांना किंवा शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे भीषण वास्तव दिसून येते. ग्रामीण भागातील मुलापेक्षा शहरी भागातील नोकरदार तरुणांना मुलींची पसंती आहे. ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. Sharad Pawar | दरम्यान, या पत्राची दखल घेत शरद पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र दाखवत त्या तरुणाला मदत करावी, असे निर्देश दिले असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. हेही वाचा: तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; ‘या’ तारखेपासून आचारसंहिता लागणार?