5kg LPG Cylinder: भाडेकरू आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासा! फक्त आयडी दाखवा आणि मिळवा ‘छोटू’ गॅस सिलेंडर
5kg LPG Cylinder: LPG कनेक्शनच्या कटकटींपासून दूर राहून झटपट गॅसची सोय हवी असेल, तर ‘छोटू’ सिलेंडर हा सध्या सर्वात सोपा आणि जलद पर्याय ठरत आहे.

5kg LPG Cylinder: पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावामुळे जगभर इंधन टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातही LPG पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या शहरात राहणारे भाडेकरू, विद्यार्थी किंवा ज्यांच्याकडे कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा नाही, त्यांच्यासाठी एक दिलासादायक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे 5 किलोचा ‘छोटू’ LPG सिलेंडर.
काय आहे ‘छोटू’ सिलेंडरची सुविधा?
सामान्य गॅस कनेक्शन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पत्त्याचा पुरावा, लांब प्रक्रिया आणि प्रतीक्षा यापासून सुटका करून देणारी ही योजना आहे. फक्त एक ओळखपत्र (आधार, पॅन इ.) दाखवून हा छोटा सिलेंडर सहज मिळू शकतो.
Bharatgas Mini सिलेंडर कसा घ्यावा?
जवळच्या Bharatgas वितरकाकडे जाऊन ओळखपत्र दाखवा आणि सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यावर 5 किलोचा सिलेंडर मिळतो. घरबसल्या अर्ज करायचा असल्यास 1800 22 4344 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून काही शहरांमध्ये 2 तासांत डिलिव्हरीही मिळू शकते.
HP Gas ‘Appu’ सिलेंडर
HP Gas चा ‘Appu’ सिलेंडर एजन्सी, पेट्रोल पंप किंवा रिटेल स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरुवातीला सिलेंडर आणि रेग्युलेटर घ्यावा लागतो. हा Free Trade LPG प्रकारात येत असल्याने कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा लागत नाही. रिफिलसाठी HP Pay अॅप, वेबसाइट, WhatsApp, मिस्ड कॉल किंवा IVRSचा वापर करता येतो.
Indane Mini LPG सिलेंडर –
Indane चा छोटू सिलेंडरही जवळच्या वितरकाकडे किंवा दुकानात सहज मिळतो. फक्त ओळखपत्र दाखवून सिलेंडर घेता येतो. पत्त्याचा पुरावा आवश्यक नसल्यामुळे भाडेकरू आणि विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय अत्यंत सोयीचा आहे.
किती येतो खर्च?
पहिल्यांदा सिलेंडर घेताना एकूण खर्च सुमारे 1300 ते 1500 रुपये येतो. यामध्ये सुमारे 1100 ते 1200 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट असते.
डिपॉझिट परत मिळते का?
होय. सिलेंडर परत करताना डिपॉझिटचा काही भाग (साधारण 50 टक्क्यांपर्यंत) परत मिळतो. त्यामुळे अल्पकालीन वापरासाठी हा पर्याय फायदेशीर ठरतो.
कोणासाठी फायदेशीर?
-दुसऱ्या शहरात राहणारे विद्यार्थी
-भाड्याच्या घरात राहणारे नागरिक
-कायमस्वरूपी पत्ता नसलेले कामगार
एकंदरीत, LPG कनेक्शनच्या कटकटींपासून दूर राहून झटपट गॅसची सोय हवी असेल, तर ‘छोटू’ सिलेंडर हा सध्या सर्वात सोपा आणि जलद पर्याय ठरत आहे.





