Germany Ukraine Pact : युक्रेनला जर्मनीचे मोठे बळ! अत्याधुनिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी संरक्षण करार
Germany Ukraine Pact : जर्मनी आणि युक्रेनमध्ये ऐतिहासिक संरक्षण करार झाला आहे. या अंतर्गत दोन्ही देश आधुनिक युद्धप्रणाली विकसित करणार असून युरोपीय संघाकडून युक्रेनला मोठे कर्ज मिळणार आहे.

Germany Ukraine Pact : जर्मनी आणि युक्रेनने संरक्षण सहकार्य करार करण्याचे निश्चित केले आहे. अत्याधुनिक ड्रोन आणि इतर युद्धसिद्ध संरक्षण प्रणालींच्या संयुक्त उत्पादनाच्या योजनांवर दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम सुरू करण्याचे निश्चित केले आहे. (Germany Ukraine Pact)
विविध प्रकारची ड्रोन, क्षेपणास्त्रे, सॉफ्टवेअर आणि आधुनिक संरक्षण प्रणाली एकत्रितपणे विकसित करण्यासाठी युक्रेनने जर्मनीला प्रस्ताव दिला होता. आता त्याविषयी दोन्ही देशांचे चमू काम करतील, असे झेलेन्स्की यांनी बर्लिन दौऱ्यादरम्यान चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
रशियाविरुद्ध युक्रेनला मदत करण्यास जर्मनी कटिबद्ध आहे, असे मर्झ यांनी सांगितले. हा रशियाला एक स्पष्ट संकेत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संरक्षण करारानुसार युरोपीय संघाकडून युक्रेनला ९० अब्ज युरो (१०६ अब्ज डॉलर)चे कर्ज मिळू शकणार आहे. (Germany Ukraine Pact)
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांच्यामुळे हे कर्ज अडकून राहिले होते. मात्र आता निवडणुकीत ओर्बान पराभूत झाल्यामुळे या कर्जाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जर्मनी आणि युक्रेन ४ अब्ज युरो (४.७ अब्ज अमेरिकन डॉलर) किमतीच्या संरक्षण पॅकेजवर सहमत झाले आहेत, असे झेलेन्स्की यांच्यासोबत बर्लिनला गेलेले युक्रेनचे संरक्षण मंत्री मिखाईलो फेडोरोव्ह म्हणाले. (Germany Ukraine Pact)





