General Naravane book : माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाची ‘पीडीएफ’ लीक; दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल
General Naravane book : या पुस्तकात लष्करी धोरणे आणि महत्त्वाच्या घटनांबाबत संवेदनशील माहिती असण्याची शक्यता असल्याने, अधिकृत प्रकाशनापूर्वीच ती लीक होणे हा गंभीर गुन्हा मानला जात आहे. याप्रकरणी आता 'स्पेशल सेल' तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहे.

General Naravane book : भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ (Four Stars of Destiny) हे अद्याप प्रकाशित न झालेले आत्मचरित्र सोशल मीडियावर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सोशल मीडिया आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मवर या पुस्तकाची प्री-प्रिंट प्रत सक्षम प्राधिकरणांच्या अनिवार्य मंजुरीशिवाय प्रसारित केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेली या पुस्तकाची टायपिंग केलेली पीडीएफ प्रत काही वेबसाइट्सवर उपलब्ध आहे. तसेच काही ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भासवले जात आहे.”
हेही वाचा: 1 एप्रिलपासून व्यवहारांमध्ये मोठे बदल; पॅन कार्डचे नवे नियम वाचले का?
लोकसभेत उमटले होते पडसाद –
गेल्या आठवड्यात लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा उल्लेख केल्याने मोठा गदारोळ झाला होता. या पुस्तकातील संदर्भांचा वापर करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. या वादामुळे लोकसभेचे कामकाजही विस्कळीत झाले होते.
या पुस्तकात लष्करी धोरणे आणि महत्त्वाच्या घटनांबाबत संवेदनशील माहिती असण्याची शक्यता असल्याने, अधिकृत प्रकाशनापूर्वीच ती लीक होणे हा गंभीर गुन्हा मानला जात आहे. याप्रकरणी आता ‘स्पेशल सेल’ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहे.
हेही वाचा: ZP निवडणूकीत भाजपच मोठा पक्ष ते शरद पवार रुग्णालयात दाखल, वाचा आजच्या टाॅप बातम्या





