‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सुरज चव्हाणचे जिनिलियाने केले कौतुक

Bigg Boss Marathi 5 | ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सीझनचा सुरज चव्हाण विजेता ठरला आहे. तर अभिजीत सावंतने दुसरे स्थान पटकावले. सूरजला 14 लाख 60 हजार इतकी धनराशी, 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर, एक बाईक आणि मानाची ट्रॉफी मिळाली. यंदाच्या मराठी बिग बॉसच्या सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अनेकदा या शोची चर्चा रंगली. बिग बॉस मराठीच्या या पर्वाने टीआरपीमध्ये अनेक रेकॉर्ड रचले.
रविवारी (6 ऑक्टोबर) या सिझनचा ग्रँड फिनाले धूमधडाक्यात पार पडला. फिनालेपूर्वी दोन आठवडे शोमधून गायब असलेल्या रितेश देशमुखने अंतिम सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. यावेळी हा फिनाले बघण्यासाठी रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखसुद्धा तिथे पोहोचली होती. ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर जिनिलियाने सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
जिनिलियाची पोस्ट
‘यातूनच स्वप्ने बनतात, मोठी स्वप्ने पाहा. बिग बॉस मराठीची ही ट्रॉफी तुझीच होती,’ असे म्हणत जिनिलियाने सूरजचं कौतुक केलं. तर तिने पती आणि ‘बिग बॉस मराठी 5’चा सूत्रसंचालक रितेश देशमुखचे देखील कौतुक केले आहे. ‘रितेश हा शो जबरदस्त होता. तू ज्या पद्धतीने हा शो पुढे नेलास, ते कमाल होते. तू बेस्ट आहेस’, असं म्हंटले. याशिवाय तिने बिग बॉस मराठीच्या पुढच्या सिझनसाठी उत्सुक असल्याचे देखील म्हटंले आहे. Bigg Boss Marathi 5 |
‘बिग बॉस मराठी 5’मध्ये गायक अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर होता, तर निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानी राहिली. धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर आणि अंकिता वालावलकर पाचव्या स्थानी होती. तर खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वत:चं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्याहीवेळी त्याने स्वत:ची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथंपर्यंत पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला. Bigg Boss Marathi 5 |






