वयाच्या १६ वर्षांनंतर लिंग परिवर्तनाला स्वीडनमध्ये मान्यता
Updated On:

स्टॉकहोम, (स्वीडन) – लिंग परिवर्तन करण्याला स्वीडनच्या संसदेने आज कायदेशीर मंजूरी दिली. लिंग परिवर्तन करण्याची शस्त्रक्रीया करण्यासाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा आता १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्यात आली आहे.
आतापर्यंत लिंग परिवर्तन करू इच्छिणार् या १८ वर्षांखालील युवक-युवतींना ही शस्त्रक्रीया करण्यासाठी पालकांची, डॉक्टरांची आणि राष्ट्रीय आरोग्य आणि कल्याण मंडळाची अनुमती घेणे आवश्यक होते.
मात्र आता १६ वर्षांवरील युवक-युवती देखील स्वतःच्या निर्णयाने लिंग परिवर्तन करू शकणार आहेत. लिंग परिवर्तनाबाबत स्वयं निर्णयाचा अधिकार १६ वर्षांवरील व्यक्तींना प्रदान करण्याबाबतचे विधेयक आज संसदेमध्ये मंजूर करण्यात आले.
या विधेयकावर संसदेत झालेल्या मतदानाच्यावेळी विधेयकाच्या बाजूने २३४ तर विरोधात ९४ मते पडली. तर २१ लोकप्रतिनिधी मतदानाच्यावेळी तटस्थ राहिले.





