GBS Pune : जीबीएस चिंता वाढतोय! उपचारदरम्यान एकाचा मृत्यू; रुग्णसंख्या १७३ वर

पुणेः शहारातील गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराची अर्थात जीबीएसची रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये रुग्णसंख्या १७० वरून १७३ झाली आहे. तर जीबीएसची आजाराची लागण झालेल्या एका रुग्णाचा उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जीबीएसमुळे आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जीबीएस आजाराने पुणेकरांची चिंता वाढवली आहे. पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणीही जीबीएस सक्रिय झाल्याचे पाहिला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गेल्या २४ तासांत नव्याने जीबीएस आजाराची लागण झालेले तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. या आजारावर उपचार घेणारे १० रुग्ण गुरूवारी बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जीबीएस बाधितांमध्ये ३४ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या ८७ ही महापालिकेच्या समाविष्ट गावातील आहे. उपाचारासाठी दाखल रुग्णांपैकी ५५ रूग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
या आजाराची लागण झालेल्या एका ६३ वर्षीय पुरुषावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याचा गुरुवारी उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण कर्वेनगरमधील वडारवस्ती येथील असल्याचे समजते. त्याला ताप, जुलाब, चालण्यास त्रास आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. २८ जानेवारीला या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



