Gautam Gambhir Siddhivinayak : वर्ल्ड कप विजयासाठी गौतम गंभीर ‘बाप्पा’च्या चरणी! सिद्धिविनायक मंदिरात घातलं साकडं; पाहा VIDEO
Gautam Gambhir Siddhivinayak : , भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

Gautam Gambhir Siddhivinayak Temple Visit : टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा बिगुल वाजायला अवघे दोन दिवस उरले असताना, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत सुरू होणाऱ्या या महाकुंभासाठी टीम इंडिया सज्ज असून, विजयासाठी गंभीर यांनी विशेष प्रार्थना केली आहे.
गंभीर यांची भक्ती आणि टीम इंडियाची शक्ती –
गौतम गंभीर गेल्या काही महिन्यांपासून महत्त्वाच्या मालिकांपूर्वी मंदिरांना भेटी देत आहेत. जानेवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्यांनी मध्य प्रदेशातील बगलामुखी आणि महाकालेश्वर मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर टी-२० मालिकेदरम्यान त्यांनी कामाख्या देवीचे दर्शनही घेतले होते.
२०२४ मध्ये प्रशिक्षक पद स्वीकारल्यापासून गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशिया चषक जिंकला असून टी-२० फॉरमॅटमध्ये संघाने जबरदस्त प्रगती केली आहे.
मुंबई के सिद्धिविनायक मंदिर पहुंचे भारतीय टीम के हेड कोच गौतम गंभीर#GautamGambhir | Gautam Gambhir | #Mumbai | Mumbai pic.twitter.com/Jw6r0P4vVS
— News24 (@news24tvchannel) February 5, 2026
विजयाचा आत्मविश्वास आणि सराव सामन्यातील ‘धमाका’
भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ४-१ ने जिंकल्यानंतर, बुधवारी झालेल्या सराव सामन्यातही भारताने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. या कामगिरीमुळे टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.
गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली
टीम इंडियाचे वेळापत्रक (ग्रुप स्टेज):
भारत आपल्या मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून करणार आहे.
७ फेब्रुवारी: विरुद्ध युएसए (USA) – पहिला सामना
१२ फेब्रुवारी: विरुद्ध नामिबिया
१५ फेब्रुवारी: विरुद्ध पाकिस्तान (या सामन्यावर सस्पेन्स कायम आहे)
१८ फेब्रुवारी: विरुद्ध नेदरलँड्स
टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, इशान किशन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग.





