Gautam Gambhir : गौतम गंभीर का मायदेशी परतले? कसोटी मालिकेपूर्वी धक्कादायक कारण समोर!

Gautam Gambhir Returns to India : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी अचानक मायदेश परतले आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ नवीन कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध खेळेल. तथापि, मालिका सुरू होण्याच्या एक आठवडा आधी गौतम गंभीर भारतात परतला आहे. वृत्तानुसार, आईच्या हृदयविकारामुळे गौतम गंभीरला घरी परतावे लागले.
गौतम गंभीर अचानक मायदेशी का परतले?
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना ११ जून रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इंग्लंड दौरा अर्ध्यावरच सोडून परतावे लागले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गौतम गंभीर १७ जूनपर्यंत संघात पुन्हा सामील होऊ शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २० जूनपासून लीड्समध्ये सुरू होईल. मालिका हेडिंग्ले येथे सुरू होईल त्यानंतर एजबॅस्टन, लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफर्ड आणि ओव्हल येथे इतर कसोटी सामने खेळवले जातील.
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
Head Coach Gautam Gambhir has flown back to India due to a family emergency.
His mother has reportedly suffered a heart attack and is currently in the ICU. 🙏#ENGvIND #GautamGambhir #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/Y6626JwNEa
— Sportskeeda (@Sportskeeda) June 13, 2025
भारतीय संघ गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये पोहोचला, जिथे संघाने आगामी मालिकेसाठी तयारी देखील सुरू केली. ही मालिका २०२५-२७ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा भाग आहे. रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, शुबमन गिलला संघाचा कर्णधार आणि ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तो रोहितच्या तुलनेत युवा संघाचे नेतृत्व करत आहे, ज्याचे लक्ष्य २००७ नंतर इंग्लंडमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे आहे.
हेही वाचा – WTC Final 2025 : पॅट कमिन्सचा मोठा धमाका! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच कर्णधार
भारत आणि इंग्लंड संघांतील या मालिकेला तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असे नाव देण्यात आले आहे. ही मालिका लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू होईल, त्यानंतर दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै दरम्यान एजबॅस्टन येथे होईल. तिसरा कसोटी सामना १० ते १४ जुलै दरम्यान लॉर्ड्स येथे, चौथा सामना २३ ते २७ जुलै दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड येथे आणि पाचवा आणि शेवटचा सामना ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे खेळला जाईल.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :





