अभिनेता आमिर खानसोबत पुन्हा एकदा स्पॅाट झाली गौरी; एका कार्यक्रमात दोघेही एकत्र झाले सहभागी, व्हिडिओ व्हायरल

Aamir Khan | बॅालीवूड अभिनेता आमिर खानने त्याचा ६० वा वाढदिवस मोठ्या धुमधड्यात मुंबईत मीडिया प्रतिनिधींसोबत साजरा केला. यानंतर आमिरने मीडियाशी संवाद साधत त्याची गर्लफेन्ड गौरी स्प्रेटशी ओळख करुन दिली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला होता. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा हे लव्ह बर्ड कपल स्पॅाट झाले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेता आमिर खान त्याची गर्लफ्रेन्ड गौरी स्प्राटसोबत मकाऊ आंतरराष्ट्रीय कॉमेडी महोत्सवात सहभागी झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोघांनीही या महोत्सवाला हजेरी लावली होती. दोघेही येताच आमिर खान त्याच्या गर्लफ्रेडकडे हात पुढे करतो आणि गौरी त्याचा हात धरते. यानंतर, दोघेही फोटो काढू लागतात. त्यांच्यासोबत चिनी अभिनेते शेन टेंग आणि मा ली हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
AamirKhan in Macao just now!!!#aamirkhan pic.twitter.com/iAa7A2nNL5
— 𝓙𝓾𝓵𝓵𝓮𝓸𝓿𝓸 (@ITSS_ALLGOODMAN) April 12, 2025
या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आमिर खान, गौरी स्प्राट, शेन टेंग आणि मा ली हे दोघे कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज देताना दिसत आहेत. फोटोंमध्ये सर्व कलाकार हसताना दिसत आहेत, त्यांना पाहून चाहते आनंदीत झाले आहेत. यावेळी आमिरने काळा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. जो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या अंगाभोवती काळ्या आणि सोनेरी रंगाची शालही गुंडाळलेली होती. दुसरीकडे, गौरीबद्दल बोलायचं झाल्यास तिने रंगेबेरंगी फुलांची साडी आकर्षक साडी परिधान केलेली आहे.
aamir comes to Macau,China!What a lovely surprise!#AamirKhan @AKPPL_Official with Shen Teng and Ma Li pic.twitter.com/pQi3wF5adC
— Monica Singh Chaddha (@chaddha_monica) April 12, 2025





