Gaurav Gogoi : हिमंत बिस्वा सरमा यांनी हजारो एकर जमीन बळकावली; गौरव गोगोईं यांचा आरोप
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांनी बुधवारी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर राज्यभरात सुमारे १२,००० बिघा म्हणजेच जवळपास ३,९६० एकरपेक्षा अधिक जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप केला

Gaurav Gogoi : आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांनी बुधवारी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर राज्यभरात सुमारे १२,००० बिघा म्हणजेच जवळपास ३,९६० एकरपेक्षा अधिक जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप केला. काँग्रेसने (Gaurav Gogoi) केलेल्या अंतर्गत चौकशीत हे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
कॉंग्रेस नेते गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांच्या म्हणण्यानुसार, हा आकडा अंतिम नसून तपास अद्याप सुरू आहे आणि पुढील काळात कथित बेकायदेशीर जमिनींचे प्रमाण वाढू शकते. जमीन घोटाळ्याच्या आरोपांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कथित पाकिस्तानशी संबंधांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी गोगोई यांच्या कथित पाकिस्तान संबंधांबाबत केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते म्हणाले, हे आरोप जर खरे असते तर गेल्या वर्षी १० सप्टेंबरलाच का मांडले गेले नाहीत? पाच महिने शांत राहिल्यानंतर अचानक हा मुद्दा पुढे आणला जात आहे. सरमा यांनी यापूर्वी जाहीर केले होते की, गोगोई यांच्या कथित संबंधांबाबतचे पुरावे ते १० सप्टेंबर २०२५ पर्यंत सार्वजनिक करतील.
गोगोई यांनी दावा केला की, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरोधातील भ्रष्टाचार व जमीन हडप प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे तयार होत असल्याची जाणीव आहे. हा मुद्दा उधळून लावण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. या आरोपांवर भाजपकडून तातडीची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
हे पण वाचा : Kunal Kamra Summons : विधान परिषद समितीकडून कुणाल कामराला समन्स






