गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यपूर्व काळात आसामला पूर्व पाकिस्तानचा भाग बनवण्याचा कट रचला गेला होता आणि काँग्रेसही त्यात सामील होणार होती, असा दावा आपल्या आसाम दौऱ्यात केला होता. यावरुन कॉंग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी जोरदार आक्षेप घेताना टीका केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणांत काँग्रेसवर हल्ला करण्यावर आणि ऐतिहासिक घटनांचे चुकीचे सादरीकरण करण्यावर भर दिला असून आसाम दौऱ्यादरम्यान भारतीय इतिहासाचे विकृत स्वरूप मांडले असल्याचे टीका गौरव गोगोई यांनी केली आहे. गोगोई म्हणाले की, पंतप्रधान दोन दिवस आसाममध्ये होते, मात्र त्यांनी दिवंगत गायक झुबीन गर्ग यांना श्रद्धांजली वाहिली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यांनी ना गर्ग यांच्या कुटुंबाची भेट घेतली, ना राज्यातील लाखो चाहत्यांप्रती सहानुभूती व्यक्त केली. यावरुन ते आसामी लोकांचे दु:ख आणि वेदना पंतप्रधान मोदींना दिसत नसल्याचे स्पष्ट होते, असे गोगोई यांनी नमूद केले. याबरोबरीने पंतप्रधान मोदी केवळ लाईट्स, कॅमेरा व पूर्वनियोजित समारंभांमध्ये इतके गुंतले होते की, सामान्य लोकांच्या भावना दुर्लक्षित राहिल्याचे ते म्हणाले. त्यांनाच जनतेचा पाठिंबा मिळेल यावेळी त्यांनी राहुल गांधींचे उदाहरण देताना ते म्हणाले की, राहुल यांनी गर्ग यांना श्रद्धांजली वाहताना, कुटुंबाची भेट घेत न्यायाची मागणी केली. यावरुन यावरुन राहुल गांधी यांना ईशान्य भारत समजतो, असे ते म्हणाले. याबरोबरीने त्यांनी केंद्र सरकारला इशारा देताना म्हणाले की, ईशान्य भारत ही प्रयोगशाळा नाही. यासाठी त्याग, रक्त, घाम व अश्रुंनी घडलेला भाग आहे. या प्रदेशाला, प्रदेशातील लोकांना आदर दिला तरच येथील लोकांचा पाठिंबा मिळतो, असे देखील गोगोई यांनी स्पष्ट केले.