Pakistan Cricket : मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सोडला पदभार, समोर आलं ‘हे’ कारण…

Gary Kirsten steps down – पाकिस्तानला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची असून यासाठी पीसीबीने रविवारी संघाची घोषणा केली होती. त्यानंतर सोमवारी मर्यादित षटकांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद गॅरी कर्स्टन यांनी आपला पदभार सोडला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या वर्षी एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांच्यासोबत दोन वर्षांचा करार केला होता. मात्र, पाकिस्तानमधील काही माध्यमाच्या दाव्यानुसार कर्स्टन यांनी सहा महिन्यांपूर्वीच करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. आगामी महिन्यात पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामान्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. 56 वर्षीय कर्स्टन यांनी 2011 मध्ये भारतीय संघाला एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. बोर्डाने निवड अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर जेसन गिलेस्पी व पीसीबी यांच्यात मतभेद झाले होते. यामुळेच गॅरी कर्स्टन यांनी देखील मर्यादित षटकांच्या संघातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
Gary Kirsten to quit Pakistan Head Coach job due to differences in opinion of him and PCB. (Cricbuzz). pic.twitter.com/t9viSj6EL0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 28, 2024
पाकिस्तान संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी गॅरी कर्स्टन हे आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. पाकिस्तान बोर्डाने त्यांच्याकडे प्रशिक्षकपद दिल्यानंतर आतापर्यंत एकही मर्यादित षटकांचा सामना झालेला नाही. त्यामुळे कर्स्टन हे एकाही सामन्यात प्रशिक्षण न देता भूमिकेतून बाहेर पडले आहेत. कर्स्टन यांच्या कार्यकाळात पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल झाले आहेत. बाबर आझमला कर्णधार करण्यात आले होते, आता पुन्हा त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.
PCB : पीसीबीने केंद्रीय करार केला जाहीर, श्रेणी-अ मध्ये फक्त 2 खेळाडू तर शाहीन आफ्रिदीचे डिमोशन…
विश्वकरंडक स्पर्धेत खराब कामगिरी…
गेल्यावर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी खूपच खराब झाली होती. पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. साखळी फेरीत पाकिस्तानला नवख्या अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गॅरी कर्स्टन यांच्याकडे प्रशिक्षकपद देण्यात आले होते.





