Pakistan Cricket Central Contracts List – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचे डिमोशन करताना त्याची श्रेणी-अ मधून श्रेणी-बी मध्ये बदलली आहे. बोर्डाने रविवारी नवीन केंद्रीय करारासाठी 25 खेळाडूंची यादी जाहीर केली. त्याचबरोबर फखर जमान, इफ्तिखार अहमद आणि ओसामा मीर यांना 2024-25 हंगामासाठी केंद्रीय करारामध्ये ठेवण्यात आलेले नाही. गतवर्षीप्रमाणेच पीसीबीने खेळाडूंची कामगिरी, फिटनेस आणि वर्तनाचे विश्लेषण करून सुमारे तीन महिन्यांच्या विलंबानंतर करार जाहीर केले. हा करार जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत असेल. श्रेणी-अ मध्ये फक्त दोघांना स्थान मिळाले. तर ब मध्ये शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि शान मसूद यांचा समावेश आहे. याशिवाय सी मध्ये 9 आणि ड मध्ये एकूण 11 खेळाडू आहेत. पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखर जमान याला करारात स्थान देण्यात आलेले नाही. आठ वर्षांत पहिल्यांदाच त्याला करारात ठेवण्यात आलेले नाही. गेल्या केंद्रीय करारापर्यंत त्याचा ब श्रेणीत समावेश होता, मात्र यावेळी त्याला थेट वगळण्यात आले आहे. यासोबतच झमानचा ऑस्ट्रेलिया दौरा तसेच झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही संघात समावेश करण्यात आलेला नाही. श्रेणी-अ मध्ये फक्त दोन खेळाडू बोर्डाने माजी कर्णधार बाबर आझम आणि मुहम्मद रिझवान या दोनच खेळाडूंना श्रेणी-अ करार दिला आहे. यासह, पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदला ड वरून ब मध्ये हलवण्यात आले आहे. यामध्ये नसीम शहाचाही समावेश आहे. तर, पाच युवा खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांना प्रथमच केंद्रीय करार देण्यात आला. ज्या पाच खेळाडूंना प्रथमच केंद्रीय करार मिळाला आहे त्यात खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद इरफान खान आणि उस्मान खान यांचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंना एका वर्षासाठी केंद्रीय करार देण्यात आला आहे. IND vs NZ 2nd ODI : दुसऱ्या वनडेत किवी संघाचे शानदार पुनरागमन; टीम इंडियाचा पराभव करत मालिकेत साधली बरोबरी… रिझवान पाकिस्तानचा नवा कर्णधार बाबर आझमच्या जागी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानकडे आता एकदिवसीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबद रविवारी घोषणा केली. या महिन्याच्या सुरुवातीला बाबर आझमने मध्यरात्री अचानक कर्णधारपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर बोर्ड नवीन कर्णधाराच्या शोधात होते. यासह शान मसूदकडे कसोटी संघाची कमान कायम राहणार आहे.