महामार्गावर कचरा; चिलट्यांचा प्रादुर्भाव
Updated On:

चिंबळी -पुणे-नाशिक महामार्गालगत कुरूळी (ता. खेड) गावात घनकचरा टाकला जात असल्याने महामार्गावर चिलटे, डासांचे प्रमाण वाढले आहे. हे चिलटे चालकांच्या डोळ्यात जात असल्याने चालक हैराण झाले आहेत. एखाद्या वेळेस मोठा अपघातही होवू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.
तर या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांनाही त्रास होत असल्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी जोर धरीत आहे.





