Ganpatipule Beach : गणपतीपुळे येथे ५ पर्यटकांचा बुडून मृत्यू; तीन जणांना वाचविण्यात यश
Ganpatipule Beach : वीकेंडला कोकणात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांच्या एका ग्रुपवर काळाने भीषण घाला घातला आहे.

Ganpatipule Beach : छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटनास गेलेल्या १९ जणांपैकी पाच जणांचा गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पोहण्यासाठी उतरले होते. यातील तीन व्यक्तींना वाचविण्यात स्थानिक बचाव दलातील जवांनाना यश आले. अजूनही काही जणांचा शोध सुरू आहे. (Ganpatipule Beach)
मृतांमध्ये आदित्य राऊत (२२), अनिकेत हिवराळे (२०), आनंद नरवडे (२०), प्रेम आदमाने (१९) आणि यश कांबळे यांचा समावेश आहे. अन्य बुडालेल्या व्यक्तींचा शोध स्थानिक शोध पथकाकडून घेतला जात असल्याचे आपत्ती विभागाचे अर्जुन मस्के यांनी सांगितले आहे. (Ganpatipule Beach)
या घटनेमुळे बिडकीन गावात शोककळा परसली. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा गट समुद्रात उतरला होता. लाटांचा वेग आणि पाण्याची खोली लक्षात न आल्याने काही जण पाण्यात ओढले गेले. पर्यटक अडकल्याचे समजताच जीवरक्षकांनी त्यांना वाचविण्यासाठी बचाव कार्य सुरू केले. समुद्र किनारी पोहण्यास गेलेल्या तिघांना वाचविण्यात आले आहे. (Ganpatipule Beach)





