Ganpati Visarjan 2024 | पुणे गणेश विसर्जन, वडापाव अन् व्यासपीठावर सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या गप्पा! ; फोटोतून पहा नेत्यांचा दिलखुलासपणा

Ganpati Visarjan 2024 | लाडक्या गणपती बाप्पाला आज पुणेकर मोठ्या उत्साहाने निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
दरम्यान , गणपती विसर्जन मिरवणुकीत अनेक राजकीय मंडळींनी देखील आपली हजेरी लावली आहे. त्यातच त्यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात मानाच्या गणपतींचे अगदी थाटात मिरवणुकीने विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणेकरांसह नेते मंडळींनी उपस्थिती लावली.

त्यात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सह सर्वपक्षीय नेतेमंडळीनी सहभाग नोंदवला.

यावेळी या नेते मंडळींनी वडापाववर ताव मारल्याचे दिसून आले.वडापाव खात त्यांनी गप्पा देखील मारल्या. दरम्यान,त्यांच्या या दिलखुलासपणाचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.






