विरोधकांच्या आक्षेपानंतरही गणपत गायकवाड यांना मतदानासाठी परवानगी; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ganpat Gaikwad | राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज 12 जुलै रोजी होणार्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर मतांची जुळवाजुळव करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान दोन्हीकडच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून काही आमदारांसह महायुतीतील तिन्ही मुख्य तीन नेत्यांकडून मतदान पार पडले आहे.
विधान परिषदेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत २४० पेक्षा जास्त आमदारांनी आपल्या मतदाचा अधिकार बजावला आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर संध्याकाळी मतमोजणी केली जाणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड हे देखील मतदानाला आल्याने वादंग निर्माण झाला आहे. गायकवाड यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे.
शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याने तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड विधान परिषद निवडणुकीसाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. पण त्यांना काँग्रेसच्या आक्षेपानंतर त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले होते. मात्र आता भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली आहे. रमेश कदम तुरुंगात असतानाही त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्याच आधारे गणपत गायकवाड यांना परवानगी देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एका जमिनीच्या वादातून उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणानंतर त्यांना अटक करण्यात आली तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी त्यांनी कोर्टाकडून परवानगी घेतली असून ते मतदानासाठी दाखल झाले आहेत. Ganpat Gaikwad |
हेही वाचा:
‘विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची चार मतं फुटणार’ काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यामुळे मविआचे टेंशन वाढले





