#Crime : कुख्यात गुंड गजा मारणे आणि साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

Updated On:

पिंपरी (प्रतिनिधी) – कारागृहातून सुटल्यानंतर रॅली काढणे कुख्यात गुंड गजा मारणे आणि साथीदारांना महागात पडत चालले आहे. यापूर्वी तळेगाव आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात दहशत माजवल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यात आता दरोड्याचा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामुळे मारणे आणि साथीदारांची पुढील काळात धरपकड केली जाणार आहे.

गजानन मारणे आणि त्याचे सात ते आठ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मारणे याची 15 फेब्रुवारी 2021 रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्याच्या पिलावळीने गजाची शेकडो गाड्यांच्या ताफ्यात तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढली.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्‍यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी मारणेच्या साथीदारांनी टोल न देता वाहने पुढे सोडली. तसेच पाण्याच्या बाटलीचे पैसे दिले नाहीत. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केल्यानंतर उघडकीस आले. त्यामुळे गजा मारणे आणि साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गज्या मारणे टोळी मोका लावण्यास पात्र – आयुक्त कृष्ण प्रकाश

रॅली प्रकरणात यापूर्वी शिरगाव चौकी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात शिरगाव पोलिसांनी आतापर्यंत 14 वाहने जप्त केली असून 36 जणांना अटक केली आहे. दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने गजानन मारणे टोळी मोक्काच्या कारवाईसाठी पात्र झाली आहे. त्याबाबत योग्य कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातून मारणे असेल किंवा अन्य कोणत्याही टोळीची पाळेमुळे खोदून काढली जाणार असल्याचेही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Baramati News : आईसोबत भांडण अन् घरातून बाहेर पडताच... आमदाराच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

2026-08-23 11:51:09

Baramati News : आईसोबत भांडण अन् घरातून बाहेर पडताच... आमदाराच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

Drug Abuse In Dehu: देहूत गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट; अल्पवयीन मुलेही नशेच्या विळख्यात

2026-08-23 08:21:18

Drug Abuse In Dehu: देहूत गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट; अल्पवयीन मुलेही नशेच्या विळख्यात

AI Transform Designers: एआयने बदलली डिझायनरची दुनिया; कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड

2026-08-23 08:15:21

AI Transform Designers: एआयने बदलली डिझायनरची दुनिया; कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड

Festive season : साखरेचे भाव गगनाला; सणासुदीत दरवाढीचा फटका

2026-08-23 07:56:07

Festive season : साखरेचे भाव गगनाला; सणासुदीत दरवाढीचा फटका

Bihar Accident : बिहारमध्‍ये सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्‍यू

2026-08-22 20:14:12

Bihar Accident : बिहारमध्‍ये सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्‍यू