Pune News : लोणंदमध्ये आर.के. फिजिओथेरपी आणि पॅरालिसिस केअर सेंटरचे उद्घाटन
Pune News : लोणंद येथील गोटे माळ परिसरात 'आर.के. फिजिओथेरपी आणि पॅरालिसिस केअर सेंटर' या अत्याधुनिक वैद्यकीय क्लिनिकचे शनिवारी (१२ सप्टेंबर) दुपारी थाटात उद्घाटन करण्यात आले.

Pune News : लोणंद येथील गोटे माळ येथे आर.के. फिजिओथेरपी आणि पॅरालिसिस केअर सेंटर या अत्याधुनिक क्लिनिकचे उद्घाटन शनिवारी (दि. १२) दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले. डॉक्टर सागर डोंबाळे आणि डॉक्टर अंकुर पिंगळे यांच्या मातोश्रींच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. (Pune News)
या प्रसंगी फलटण, खंडाळा आणि बारामती तालुक्यांतील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सभापती शंकरराव वाडकर, सेवानिवृत्त एसपी सर्जेराव ठोंबरे, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, माजी चेअरमन महानंद डेअरी डी. के. पवार, प्रमोद महानोर, लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागर गालींदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, युवा नेते हर्षवर्धन शेळके-पाटील, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, युवा नेते सुनील यादव, पवन धायगुडे-पाटील तसेच फलटण तालुक्याचे माजी सभापती आणि विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. (Pune News)
उद्घाटनाच्या दोन दिवस आधी रघुनाथ फाउंडेशन आणि पोपटराव तात्या धायगुडे यांच्या स्मरणार्थ फिजिओथेरपी व हाडांची घनता तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे १२५ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. (Pune News)
लोणंद व पंचक्रोशीतील पॅरालिसिसग्रस्त रुग्ण तसेच हाडांच्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना उपचारासाठी यापूर्वी शहरातील मोठ्या केंद्रांवर जावे लागत होते. मात्र, लोणंदमध्येच प्रथमच अत्याधुनिक सुविधांसह फिजिओथेरपी व पॅरालिसिस केअरची सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Pune News)
यावेळी डॉ. सागर डोंबाळे व डॉ. अंकुर पिंगळे यांनी सांगितले की, “हे केंद्र केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने सुरू केलेले नाही. रुग्णांना मनापासून उपचार आणि योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.” केंद्रात अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध असून रुग्णांना अल्पदरात उपचार देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Pune News)




