Ganesh Visarjan 2024 । मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरीचे थाटात विसर्जन

Ganesh Visarjan 2024 । पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या श्री कसाब गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन 5 वाजून 12 मिनिटांनी करण्या आले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली असून ढोल ताशाच्या गजरात पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान , सकाळी टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीत ही पालखी सहभागी झाली. यामध्ये सतीश आढाव यांचे नगारावादन करण्यात आले.
तर, न्यू गंधर्व ब्रास बँड यंदा पुण्यात प्रथमच बँडवर “शिवतांडव’ धून वाजवली. तसेच समर्थ प्रतिष्ठान “भगवाधारी’ ताल रुपात अयोध्यापती अवतरले. मिरवणुकीत शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाकडून मल्हारी मार्तंड- खंडोबाचा जागर केला. विशेष म्हणजे, कारगील विजयाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडियन आर्मीला ढोल-ताशा पथक मानवंदना दिली.
त्यातच पहिल्या श्री कसबा गणपतीचे विर्सजन झाले आहे. पुण्याच्या पतंगा घाटावर आरती करून कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 4.35 मिनिटांनी झाले.





