Ganesh Visarjan 2024 । मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीचे विसर्जन

Ganesh Visarjan 2024 । पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्याच्या मनाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीचे उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन झाले. श्री तुळशीबाग गणपतीचे ७ वाजून १ २ मिनिटांनी विसर्जन झाले.
सकाळी १०.३० वाजता टिळक पुतळा मंडई येथून पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत श्रींच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.
यंदा बाप्पांची मिरवणूक जगन्नाथ पुरी रथातून निघली. फुलांनी सजवलेल्या ३२ फुट उंच रथातून ही मिरवणूक निघाली. लकडी पुलावरील मेट्रो पुलामुळे उंचीला मर्यादा असल्याने हायड्रॉलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, बाप्पाच्या मिरवणूक रथाची सरपाले बंधूंनी पुष्पसजावट केली आहे. रथावर श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा या देवता विराजमान आहेत. तसेच पुरी येथील श्री जगन्नाथाच्या रथाप्रमाणे बाप्पांचा रथ कार्यकर्त्यांनीच ओढला. त्यात “शिवमुद्रा’चा गाजत असलेला श्री जगन्नाथचा ठेका मिळाला.
मिरवणुकीत अग्रभागी लोणकर बंधूंचे नगारावादन, स्व-रुपवर्धनी, गजलक्ष्मी ही वाद्य पथके सहभागी झाली. मिरवणुकीत – स्वरूपवर्धिनीची मल्लखांबची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.





