Koynanagar News : मळे, कोळणे व पाथरपुंजमध्ये आज होणार ‘श्री’ची प्रतिष्ठापना; पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याची प्रार्थना
Koynanagar News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वसलेली मळे, कोळणे आणि पाथरपुंज ही गावे गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Koynanagar News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील मळे, कोळणे आणि पाथरपुंज ही गावे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. गावांच्या भवितव्याचा प्रश्न कायम असतानाही ग्रामस्थांनी श्रद्धेची आणि सांस्कृतिक परंपरेची नाळ मात्र तुटू दिलेली नाही. (Koynanagar News)
या परंपरेनुसार गणपती बाप्पाच्या मूर्ती कोयनानगर येथून आज वाजतगाजत या तीन गावांकडे रवाना झाल्या. उद्या तिन्ही गावांत गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या गावांच्या सुख- समृद्धीसोबतच पुनर्वसनाचा प्रश्न लवकर मार्गी लागावा, अशी प्रार्थना गणरायाकडे व्यक्त केली जात आहे. (Koynanagar News)
कोयनानगर येथे या परंपरेचा उत्साह पाहायला मिळाला. आबालवृद्धांचा सहभाग, भक्तिमय वातावरण आणि बाप्पाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. गावाकडे रवाना झालेली ही गणरायाची स्वारी आता उद्या प्रतिष्ठापनेनंतर भक्तिमय उत्सवाचे रूप धारण करणार आहे. (Koynanagar News)
मळे, कोळणे आणि पाथरपुंजमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गावागावांत आरती, धार्मिक कार्यक्रम आणि गणेशोत्सवाची लगबग सुरू होणार आहे. (Koynanagar News)





