Satara News : गाईचे शेण आणि शाडूची गणेशमूर्ती ठरतेय लक्षवेधक

सातारा : कुंभार वाड्यातील कलाकारांनी साकारलेल्या गाईचे शेण व शाडू मातीची गणेशमूतीं. बेधून घेत आहे. गणेशोत्सव, महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि प्रिय सण, पण गेल्या काही वर्षांपासून या उत्सवामुळे पर्यावरणाची होणारी हानी ही एक गंभीर समस्या बनली आहे. म्हणूनच, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा वापर करण्याकडे सातारकरांचा कल वाडू लागला आहे. कुंभार वाड्यातील कलाकाराने गाईचे शेण आणि शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारली आहे.
अत्यंत देखणी अशी ही इको फ्रेंडली मूती नागरिकांचे लक्ष केसरकर पेठेतील अविनाश राजे आणि मोहिनी राजे यांनी या फ्यांवरणपूरक मूर्ती साकारल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये वापरल्या जाणार्या पारंपरिक गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पंरिस पासून बनवलेल्या असतात. या मूर्ती दिसायला सुंदर असल्या तरी त्या पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहेत.
त्यामुळे राजे दांपत्य गेल्या काही वर्षांपासून शाडू माती आणि कागदाच्या लगद्यापासून घरमुर्ती पूजेच्या गणेश मूर्ती तयार करतात. यावर्षी पहिल्यांदाच त्यांनी गाईचे शेण आणि शाडू यांचा वापर करून मूर्ती साकारल्या आहेत. पुणे, बेळगाव आणि विजापूर येथे तब्बल साडेतीनशे मूर्ती त्यांनी तयार करून पाठवल्या.
मूर्ती तयार करण्याचा या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. गणेशमूर्ती तयार करण्याचा ते पूर्णवेळ व्यवसाय करतात, याविषयी बोलताना मोहिनी राजे यांनी सांगितले की, साधारण दिवाळो झाली की आम्ही पुढच्या वर्षांच्या गणेशोत्सवाच्या तयारीला लागतो, माती आणणे, मूर्ती तयार करणे, त्या रंगवणे ही सर्व कामे आम्ही दोघंच करतो.
अलीकडच्या काळात गणेश मूर्ती करणायां कारागिरांची संख्या कमी झाली आहे. कामगार मिळत नाहीत, मिळाले तर त्यांच्या कामात सातत्य नसते. अशा अनेक आबी निर्माण होतात. त्यामुळे कामगार शोधत बसण्यापेक्षा आम्ही दोघेच मृतीं तयार करून विक्री करण्याचा पूर्ण वेळ व्यवसाय करतो.
शाहू आणि कागदाच्या लगद्यापासून गेली काही वर्षे मूर्ती तयार केल्या जातात. यंदा पहिल्यांदाच गाईच्या शेणाचा वापर केला आहे. गाईच्या शेणाची भुकटो बाजारात मिळते. ही भुकटी आणि शाडू माती समप्रमाणात वापरून गणेश मूती साकारल्या आहेत. त्याचा रंगही पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाही. त्यामुळे या मूनों पयांवरणपूरक ठरल्या आहेत.
– अविनाश राजे, मुर्तीकार





