ganesh festival : विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे 1.51 लाख मोदकाची तयारी सुरू; जाणून घ्या मोदकाचे महत्त्व?

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील प्रसिध्द असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी देशभरान सुमारे २ लाखा पेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज असून संस्थानकडून १.५१ लाख नवसाचे मोदक वाटप केले जाणार असल्याची माहिती संस्थानचे सचिव दिलीप बांगर यांनी दिली आहे. यावर्षी स्तनदा मातांसाठी आठ ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोली येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मोदकाचा गणपती म्हणून देशभरात प्रसिध्द आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी नवसाचा मोदक दिला जातो. संपूर्ण वर्ष भर या मोदकाची पूजा केली जाते. त्यानंतर नवस पूर्ण झाल्यानंतर १००१ मोदक गणपतीला अर्पण केला जातात. दरवर्षी या ठिकाणी अनंत चतुर्थीला मोदक घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या शिवाय नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांचीही गर्दी होते.
विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची मंगळवारी ता. १७ सकाळी ९ वाजता संस्थानच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत महा आरती झाल्यानंतर नवसाच्या मोदकाचे वाटप केले जाणार असून यावर्षी १.५१ लाख मोदकांचे वाटप केले जाणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. यावर्षी गणेशमुर्ती स्थापनेपासून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे.
यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी ता. १७ देशभरातून सुमारे २ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहेत. त्यानुसार संस्थानकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण. कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने या भागात पाहणी केली असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
या शिवाय पालिकेकडून स्वच्छतेसाठी सर्वच साफसफाई कर्मचारी दिवसभर या ठिकाणी स्वच्छतेची कामे करणार आहेत. तसेच स्वयंसेवक देखील मदतीला असणार आहेत. या शिवाय आरोग्य पथक देखील कार्यरत राहणार आहेत.
यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी ता. १७ देशभरातून सुमारे २ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहेत. त्यानुसार संस्थानकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने या भागात पाहणी केली असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
या शिवाय पालिकेकडून स्वच्छतेसाठी सर्वच साफसफाई कर्मचारी दिवसभर या ठिकाणी स्वच्छतेची कामे करणार आहेत. तसेच स्वयंसेवक देखील मदतीला असणार आहेत.
या शिवाय आरोग्य पथक देखील कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, शासकिय रुग्णालयात रक्तबाटल्यांचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना गणपतीचे थेट दर्शन मिळणार आहे.
या सोबतच जेष्ठ नागरीक, दिव्यांग, गरोदर माता यांना थेट दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच विघ्नहर्ता ग्रुपच्या वतीने स्तनदा मातांसाठी आठ ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन केला जाणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे.
हिंगोली शहरात दानशूर व्यक्ती, व्यापारी, सेवाभावी संस्था, व्यायामशाळांच्या वतीने भाविकांच्या चहापाणी, नाश्ता, भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. तर भाविकांच्या वाहतुकीसाठी अॅटो संघटनेकडून मोफत वाहतुक केली जाणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.
तीन किलोमिटर अंतरापर्यंत असणार दर्शनरांग गणपतीच्या दर्शनासाठी तीन किलोमिटर अंतरापर्यंत भाविकांची रांग असणार आहे. रेल्वेस्थानक मार्गापासून दर्शन रांग सुरु होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गणपती चौक, महात्मा गांधी चौक, महावीर चौक, जूने ग्रामीण पोलिस ठाणे पासून गणपती मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे.





