Ganesh Bidkar : गणेश बिडकरांना ‘ग्रीन क्रुसेडर’ पुरस्कार प्रदान
पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि पुणे शहराच्या शाश्वत विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांना ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले.

Ganesh Bidkar : पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि पुणे शहराच्या शाश्वत विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांना ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भामला फाउंडेशन आणि पंचशील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे चॅप्टरच्या पुरस्कार सोहळ्यात (Ganesh Bidkar) हा सन्मान करण्यात आला. या वेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सभागृह नेते अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. प्रशासकीय कामकाजासोबतच सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन, नागरिकांच्या समस्या आणि शहराच्या शाश्वत विकासाला त्यांनी प्राधान्य दिले.
पुण्याच्या जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांचे संवर्धन, विविध विकास प्रकल्पांना गती देणे तसेच विकास प्रक्रियेत लोकसहभाग वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड’ दिला जातो. बिडकर यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक व पर्यावरणीय कार्याची दखल मानला जात आहे.






