या गावात थेट मंदिरात जुगार

राजगुरूनगर (पुणे) – बहिरवाडी (ता. खेड) येथे एका मंदिर परिसरात जुगार खेळणाऱ्या सात जणांवर खेड पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 1 हजार 910 रुपये रोख व खेळाच्या साहित्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात मंगळवारी (दि 24) सायंकाळी पावणेपाच वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. बाजीराव विठ्ठल राक्षे (वय 47), साहेबराव महादु शेडाणे (वय 42), संतोष मारूती राक्षे (वय 43), सुभाष ज्ञानेश्वर राक्षे (वय 35), राघु बळवंत राक्षे (वय 50), दत्तात्रय सावळेराम शेडाणे (वय 40) व काळु मारूती राक्षे (वय 38, सर्व रा. बहिरवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण बेकायदा, बिगर परवाना तीनपत्ती नावाचा जुगार पैसे वापरून खेळत असताना पोलिसांना मिळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 4, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई स्वप्नील लोहार यांनी फिर्याद दिली आहे.





