निधी उपलब्ध करण्यात गडाखांनाच आले अपयश..

नेवासा – नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात नेवासा तालुक्याला विकास निधी न मिळाल्याचा कांगावा आमदार गडाखांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तालुकाभर केला.
नेवासा तालुक्याला जाणीवपूर्वक तसेच विरोधातील आमदार असल्याचे सांगत,विकास निधी न दिल्याचे कारण गडाखांकडून सांगितले जात आहे,परंतु नगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड पारनेर, श्रीरामपूर, कोपरगाव अशा अनेक मतदार संघात विरोधी आमदार असून देखील त्या विधानसभा सदस्यांनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मिळविलेला असून नेवासा तालुक्याचे आमदार तालुक्याला निधी मागण्यासाठी विधानसभेत गेले की, पाकिस्तानच्या विधानसभेत गेले होते असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
प्रसिद्धिस दिलेल्या पञकात फुलारी यांनी म्हटले आहे की,तालुक्याच्या विकासासाठी गडाख यांनी कुठलेही प्रयत्न केलेले नसून त्यांची कार्यप्रणालीच सपशेल अपयशी ठरलेली आहे,विकास निधीची मागणी केली असती तर मिळणाऱ्या कामांचे टेंडर आपल्या ठेकेदार कार्यकर्त्याला मिळतील की, नाही? या शंकने गडाखांनी निधी साठीचा पाठपुरावाच केला नसल्यामुळे तालुक्याला विकास निधी मिळालेला नाही यामुळे नेवासा तालुका भकास करण्यास गडाखच खरे कारणीभूत असल्याचा दावा फुलारी यांनी केला आहे.
या अधिवेशनात श्री.संत ज्ञानेश्वर महाराज तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास निधीची तरदूत केल्याची घोषणा विधानभावनात केलेली आहे याचे ही श्रेय घेण्याची संधी गडाखांनी संस्थांनाच्या अध्यक्षामार्फत सोडलेली नाही, या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी मिळवण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ पासून वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला असून, आमदार गडाखांनी मात्र याचे श्रेय लाटण्याचा मिश्किल प्रयत्न केला तसेच संस्थांनाच्या विकास निधीचे श्रेय संस्थांनाच्या अध्यक्षा मार्फत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा तसेच संस्थांनाला राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दोन वेळा बैठक घेतली मात्र त्या बैठकीस गडाख कधीच उपस्थित राहीलेले नव्हते बैठकीचे नियोजन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेले होते हा श्रेय लाटण्याचा प्रकार म्हणजे उंदराला मांजरची साक्ष ठेवण्याच्या सदरात मोडणारा असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी पत्रकात केला आहे या प्रकाराची तालुक्यात मोठी गावोगावी खमंग राजकीय चर्चेचा फड रंगला जात आहे.





