G. Kishan Reddy : सात कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारणार; मंत्री जी. किशन रेड्डींनी दिली माहिती
भारताचे ऊर्जा क्षेत्रातील परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ६४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सात कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प (G. Kishan Reddy) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

G. Kishan Reddy : भारताचे ऊर्जा क्षेत्रातील परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ६४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सात कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प (G. Kishan Reddy) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी सोमवारी राज्यसभेत ही माहिती देताना सांगितले की, यातील चार प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात होणार असून उर्वरित तीन प्रकल्प ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये साकारले जातील.
या प्रकल्पांच्या माध्यमातून कोळशाचे रूपांतर सिनगॅसमध्ये केले जाणार असून, त्याचा वापर मेथॅनॉल, अमोनिया आणि हायड्रोजन उत्पादनासाठी केला जाईल.
गेल्या १२ वर्षांत कोळसा क्षेत्रात झालेल्या पारदर्शक सुधारणांमुळे सध्या देशात विजेचा कोणताही तुटवडा नाही. भारताकडे जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोळसा साठा असून गॅसिफिकेशन तंत्रज्ञानामुळे आयातीवरचा खर्च वाचून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.
व्यावसायिक कोळसा खाण धोरणांतर्गत वाटप करण्यात आलेल्या खाणींपैकी १२ खाणींमध्ये उत्पादनही सुरू झाले असून, संपूर्ण प्रक्रिया लिलाव पद्धतीने अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात असल्याचे त्यांनी (G. Kishan Reddy) आवर्जून नमूद केले.






