पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ – सचिन विटकर

Pune : पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे बुधवार रोजी (२८ फेब्रुवारी) विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले व मराठी दिवस साजरा करण्यात आला. विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर बालगणांचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम पेरिविंकलचे शिक्षक अतिशय उत्तमरीत्या करीत आहेत, असे प्रतिपादन पत्रकार सचिन विटकर यांनी आज केले.
आधुनिकतेबरोबरच परंपरागत साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांकडून मराठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृती व वारसा जपत ग्रामीण संस्कृतीचे दर्शन मराठी प्रदर्शनात दाखवण्यात आले.आजच्या युगातही ग्रामीण कला किती उपयुक्त ठरू शकते या विषयाला अनुसरून लहान-मोठे प्रकल्प या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडले होते.

इयत्ता पहिली ते आठवी असे विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विज्ञान विषय देण्यात आले होते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा प्रमुख पाहुणे राहुल खोपडे यांनी व्यक्त केली.
तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेला भेट दिली. विद्यार्थ्यांना या संस्थेत मेघदुत ॲप , दामिनी ॲप, प्रत्युष,सफर पुणे वायुदल, ICP मास स्पेक्ट्रोमीटर, लेजर समस्थानिक विश्लेषण, ( समस्थानिक तथा सूक्ष्म मात्रीक तत्व प्रयोगशाला),वृक्ष वलयी जानवायु विज्ञान प्रयोगशाळा,सायरन, जनवाणी विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.दिवसभर विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रदर्शन बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प मार्गदर्शक म्हणून शितल निंबाळकर, हर्षदा पांडे, योगिता महाजन, मनीषा क्षिरसागर, वृषाली ब्रम्हे, चारुशीला गव्हाळे यांचे मार्गदर्शन लाभले.




