Ayatollah Ali Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर 4 महिन्यानंतर होणार अंत्यसंस्कार; राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांच्यासह अनेकांना अश्रु अनावर
Ayatollah Ali Khamenei : 9 जुलै रोजी मशहाद येथील इमाम रेझा दर्गा परिसरात अयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवाचा दफनविधी पार पडणार

Ayatollah Ali Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमेरिका -इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमधील निवासस्थानी ८६ वर्षीय खमेनी यांचा मृत्यू झाला होता.
अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला तब्बल १३१ दिवसांनी सुरुवात झाली आहे. त्यामुळे जगभरातून मोठ्या संख्येने नागरिक हजर राहण्याची शक्यता आहे.
तेहरानमधील मोसल्ला संकुलात अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांच्या शवपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्यासह देशातील वरिष्ठ नेतृत्वाने तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे उपस्थित राहून खामेनेई यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांना अश्रू अनावर झाले.
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या शोकसभेत अखेरचा निरोप देताना इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनाही अश्रू अनावर झाले. तेहरानमधील एका शासकीय समारंभात हा अत्यंत भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. (Ayatollah Ali Khamenei)
#WATCH | Tehran, Iran: Visuals from the funeral ceremony of Iran’s late Supreme Leader Ayatollah Ali Khamenei, who was killed on February 28 during Israeli and US airstrikes on Iran
(Source: IRIB Pool via Reuters) pic.twitter.com/QWmZtyRAUB
— ANI (@ANI) July 3, 2026
२८ फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला होता. त्या सर्वांचे पार्थिव देखील याच शीतगृहात एकत्र ठेवण्यात आले होते. काल अयातुल्ला खामेनी आणि त्यांच्या नातेवाईकांचे पार्थिव तेहरानच्या भव्य ‘मोसल्ला मशीद’ संकुलात आणण्यात आले.
सध्या अयातुल्ला अली खामेनी यांचे पार्थिव मोसल्ला मशीद संकुलात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, इराण आणि इराकच्या पाच प्रमुख शहरांमधून खामेनी यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर ९ जुलै रोजी त्यांच्या मूळ गावी मशहाद येथील इमाम रेझा दर्गा परिसरात त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी पार पडेल.
सुरक्षेच्या कारणास्तव पुत्र मोजतबा खामेनी गैरहजर (Ayatollah Ali Khamenei)
दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांनी सध्या सुरक्षेच्या कारणास्तव वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणे टाळले आहे. यापूर्वी १९८९ मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी आणि २०२० मध्ये कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी होऊन अनेकांनी जीव गमवला होता. त्यामुळे इराण सरकारकडून काळजी घेऊन योग्य नियोजन केले जात आहे. (Ayatollah Ali Khamenei)
हेही वाचा:





