Ali Khamenei Death : अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सुप्रीम लीडर कोण? ‘या’ नावांची चर्चा
Ali Khamenei Death : आयातुल्ला अली खामेनींच्या निधनानंतर इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची जागा रिक्त झाली आहे. पुढील सुप्रीम लीडर कोण? यावर चर्चा सुरू आहे

Ali Khamenei Death : अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरू असून यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातू यांनाही ठार करण्यात आलं आहे. इराणी माध्यमांनी देखील खमेनी यांच्या मृत्युची पुष्टी केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, आयातुल्ला अली खामेनींच्या निधनानंतर इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची जागा रिक्त झाली आहे. पुढील सुप्रीम लीडर कोण असेल यावर चर्चा सुरू आहे. आयातुल्ला अराफी, मोहसीन कोमी आणि गुलाम हुसेन एजई ही तीन प्रमुख नावे आघाडीवर आहेत. Ali Khamenei Death
आयातुल्लाह अलीरेजा अराफी
आयतुल्लाह अलीरेजा अराफी हे एक ज्येष्ठ धार्मिक व्यक्ती आहेत. इराणमधील सर्व मदरशांचं ते नेतृत्व करतात. तसेच गार्जियन कौन्सिल तसेच असेंबली ऑफ एक्सपर्ट्सचे ते सदस्य आहेत. त्यांना देशाच्या सर्वोच्च पदी बसवल्याने एक धार्मिक नेताच पुन्हा सत्तेत येईल, यामुळे खामेनी यांचा उत्तराधिकारी म्हणून आयतुल्लाह अलीरेजा अराफी यांच्याकडे पाहिले जाते. Ali Khamenei Death
होज्जात ओल इस्लाम मोहसीन कोमी
होज्जात ओल इस्लाम मोहसीन कोमी हे आयातुल्ला खामेनींच्या कार्यालयातील प्रमुख सल्लागार आहेत. तसेच खामेनींचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. कोमी यांच्याकडे धार्मिक योग्यता आणि संस्थागत अनुभवही आहे.
आयतुल्लाह गुलाम हुसैन मोहसिनी एजई
आयतुल्लाह गुलाम हुसैन मोहसिनी एजई हे इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय पार्श्वभूमी आणि उच्च सरकारी पदावर असल्याने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सध्या इराणमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, या परिस्थितीमध्ये त्यांचा प्रशासकीय अनुभव देश सावरण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. Ali Khamenei Death
इराणमधील हा दुसरा सत्ता बदल ठरणार
आयातुल्ला अली खामेनीं हे 1989 पासून इराणवर सत्ता गाजवत होते. परंतु आता खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 1979 नंतरच्या इस्लामी क्रांती नंतरची इराणमधील हा दुसरा सत्ता बदल ठरणार आहे. त्यावेळी रुहोल्लाह खामेनी यांनी इस्लामी गणराज्याची स्थापना केली होती.
रुहोल्लाह खामेनी यांचा 1989मध्ये मृत्यू झाल्यानंतर आयातुल्ला अली खामेनी यांना राष्ट्रपतीपद देण्यात आलं. दरम्यान, इराणची सत्ता तज्ज्ञांच्या परिषद द्वारे निश्चित केली जाते, ज्यामध्ये 88 प्रमुख धार्मिक विद्वान (मौलवी) असतात. ही परिषद अधिकृतपणे नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करते.
हेही वाचा:






