लाडकी बहीण योजनेसाठी ४१० कोटींचा निधी मंजूर; ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार?

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झाले आहेत. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४१० कोटींचा निधी मंजूर झाला. शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याबाबत एक माहिती सध्या समोर आली आहे.
काही वृत्तांनुसार, ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिना अखेरपर्यंत येऊ शकतो. दिवाळी असल्याने राज्य सरकार महिनाअखेरपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसै जमा करु शकतात. याबाबत लवकरच मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
ई केवायसी करणे अनिवार्य
तर दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेत महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर पात्र महिलांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई-केवायसी केली आहे. याशिवाय ई केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवर देखील तोडगा काढला जात असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojana |
हेही वाचा:





