अल्टू अंकल आणि सोनपरीसोबत ‘फ्रुटी’ने शेअर केले लेटेस्ट फोटो; जुन्या आठवणींना दिला उजाळा

Sonpari Show । ‘सोनपरी’ या मालिकेची लहान मुलांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत असे. यात मराठमोळ्या मृणाल कुलकर्णीने सोनपरीची भूमिका साकारली होती. तर फ्रुटीची भूमिका तन्वी हेगडेने निभावली होती. तिच्याजवळ नेहमी सोनपरी आणि अल्टू अंकल असायचे.
ही लहान फ्रुटी आता मोठी झाली असून २४ वर्षांनी तिने सोनपरी आणि अल्टू अंकलसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तन्वी तिच्या सहकलाकार मृणाल कुलकर्णी आणि अशोक लोखंडेसोबत दिसत आहे. पहिल्या चित्रात तन्वीने एक नवीन आणि जुना फोटो कोलाजसह पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सगळे एकसारखी पोज देताना दिसत आहे.
View this post on Instagram
दुसऱ्या एका चित्रात तन्वी आणि मृणाल एकत्र पोज देताना दिसत आहेत. पुढील चित्रात अशोक लोखंडे तिला मिठी मारताना दिसत आहेत. तन्वीने फोटो शेअर करत लिहिले, “बरेच जण मला विचारतात की तुम्ही अजूनही भेटता का, संपर्कात आहात का आणि एकत्र कधी दिसाल. आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली आहे. सेटवरचे माझे पालकच आहेत हे आणि बेस्ट सहकलाकार आहेत. आठवणींना उजाळा मिळाला.” तन्वी हेगडच्या या पोस्टनंतर अनेकानी त्याना पुन्हा कमबॅक करण्याची मागणी केली आहे.
सोनपरी व्यतिरिक्त तन्वीने ‘शक लाका बूम बूम’, ‘हिप हिप हुर्रे’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, ती बऱ्याच दिवसांपासून अभिनयापासून दूर होती. 2016 मध्ये ती शेवटची मराठी चित्रपटात दिसली होती.
हेही वाचा:
रॅपर हनी सिंगने केला खुलासा,’ब्लू है पानी-पानी..’ हे मी लिहिलेले सर्वात अर्थहीन गाणे’





