रॅपर हनी सिंगने केला खुलासा,’ब्लू है पानी-पानी..’ हे मी लिहिलेले सर्वात अर्थहीन गाणे’

रॅपर आणि गायक हनी सिंग बऱ्याच दिवसांनी कामावर परतला आहे. नुकताच त्याचा नवीन अल्बम ‘ग्लोरी’ रिलीज झाला आहे. अशात हनीने एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत आणि गाण्यांबाबत खुलासे केले आहे.
तो म्हणाला मी जेव्हा माझी जुनी गाणी ऐकतो त्यावेळी खूप हसतो. त्या गाण्यामध्ये यमक नव्हते तरीही ते सर्वांना आवडले. ही गाणी लोकप्रिय का झाली ते समजत नाही. असेही तो म्हणाला आहे.
मुलाखतीत हनीने सांगितले की, ‘यारियां’ चित्रपटातील ‘ब्लू है पानी-पानी’ हे गाणे मी अवघ्या दोन तासांत तयार केले होते. मी आजपर्यंत लिहिलेले सर्वात बकवास गाणे आहे. ‘ब्लू है पानी पानी’… हे गाणे आहे. आज ब्लू है पानी पानी और दिल भी सनी सनी.. हे किती मूर्ख गाणे आहे. खरे सांगायचे तर सगळी गाणी बघा, त्यांना काही अर्थ आहे का? पण आजही लोक या गाण्यामागे वेडे आहे.
हनी पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे आणखी एक गाणे आहे… ‘लुंगी डान्स लुंगी डान्स’. हे काय आहे. मला लोक मला डोक्यावर का बसवतात हेच कळत नाही. आज जेव्हा मला ती गाणी सादर करायची आहेत, तेव्हा मी स्वतःवर हसतो की लोक अजूनही वेडे आहेत, नाचत आहेत..’ असं म्हणत त्याने आपल्याच गाण्यांना अर्थहीन म्हटले आहे.
हनी पुढे म्हणाला की आजही या गाण्यांमधून त्याला कमाई मिळते कारण ही गाणी आजही वाजवली जातात. गायकाने सांगितले की या गाण्यांचा आवाज चांगला आहे आणि गोष्टी नवीन आहेत, काही भन्नाट गोष्टी आहेत, काहीतरी विचित्र ऐकू येत आहे, त्यामुळे लोकांना ते आवडले आहे.
हनी सध्या त्याच्या नवीन अल्बम ‘ग्लोरी’मुळे चर्चेत आहे. या अल्बममध्ये एकूण 18 गाणी असून गायकाच्या कारकिर्दीतील हा चौथा अल्बम आहे. नुकतेच टी-सीरिजने आपल्या यूट्यूब चॅनलवर ते रिलीज केले आहे.





