Ajit Pawar: एका सोलो रनरपासून हजारो रनर्सच्या जनचळवळीपर्यंत… ‘आरोग्यवारी अल्ट्रा रन’चा प्रेरणादायी प्रवास
Ajit Pawar लोकनेते स्वर्गीय अजितदादांचा नेहमीच विश्वास होता की निरोगी समाज आणि तंदुरुस्त तरुण हीच राज्याची खरी ताकद आहे. खेळ, आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैली यांना त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले. त्याच विचारातून 'आरोग्यवारी'ची संकल्पना साकार झाली आणि आज हजारो रनर्स त्या विचारांशी जोडले गेले आहेत.

Ajit Pawar: काही उपक्रम हे केवळ स्पर्धा नसतात, तर ते एका विचाराला लोकचळवळीचे रूप देतात. ‘आरोग्यवारी अल्ट्रा रन’ हा माझ्यासाठी असाच एक भावनिक प्रवास आहे.
सन २०२० मध्ये माझे स्फूर्तीस्थान लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या निरोगी, सुदृढ आणि दीर्घायुष्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्याचा संकल्प केला. त्या पहिल्याच वर्षी स्वतः सोलो 100 किमी रन पूर्ण केली आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. त्या एका सोलो रनरपासून सुरू झालेला हा प्रवास आज देशभरातील ३,५०० हून अधिक रनर्सना जोडणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अल्ट्रा रनमध्ये रूपांतरित झाला आहे.
लोकनेते स्वर्गीय अजितदादांचा नेहमीच विश्वास होता की निरोगी समाज आणि तंदुरुस्त तरुण हीच राज्याची खरी ताकद आहे. खेळ, आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैली यांना त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले. त्याच विचारातून ‘आरोग्यवारी’ची संकल्पना साकार झाली आणि आज हजारो रनर्स त्या विचारांशी जोडले गेले आहेत. या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सहभाग पूर्णपणे मोफत आहे. कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. तरीही रनर्सना अधिकृत टी-शर्ट, बीआयबी नंबर रॅपिड टायमिंग चिप, फिनीशर मेकंस सहभाग प्रमाणपत्र, वैद्यकीय सुविधा, हायड्रेशन पॉइंट्स, पौष्टिक आहार, स्वयंसेवकांचे सहकार्य आणि आवश्यक तेथे वाहतूक अशा जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातात.
५० आणि १०० किलोमीटरचे मार्ग World Athletics आणि AIMS यांच्या निकषांनुसार प्रमाणित आहेत. त्यामुळे प्रत्येक रनरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचा अनुभव मिळतो. रामती स्पोर्ट्स फाउंडेशनमधील आमची संपूर्ण टीम, शेकडो स्वयंसेवक, प्रशासन आणि विविध शासकीय विभाग यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य होत आहे.
स्वर्गीय अजितदादांच्या अकाली निधनाने माझ्यासह संपूर्ण बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, खासदार पार्थदादा पवार आणि युवा नेते जयदादा पवार यांनी हा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या भक्कम पाठबळामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली.
आज ‘आरोग्यवारी अल्ट्रा रन’ ही केवळ रननसून निरोगी जीवनशैलीचा, सकारात्मक विचारांचा आणि समाजाला एकत्र जोडणाऱ्या चळवळीचा उत्सव बनली आहे.
एका सोलो रनरपासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो रनर्सना जोडणारा विश्वासाचा उत्सव झाला आहे. स्वर्गीय अजितदादांच्या निरोगी, सशक्त आणि क्रीडाप्रेमी समाजाच्या स्वप्नाला जागतिक स्तरावर पोहोचवणे, हीच माझ्यासाठी आणि बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या प्रत्येक सहकाऱ्यासाठी त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे.या वर्षी तुम्हीही या आरोग्य चळवळीचा भाग व्हा… कारण ही केवळ Run नाही, तर एका विचारासोबतची आयुष्यभराची जोड आहे.
| – सतीश ननावरे, बारामती | |||





