French Open 2025 : अल्काराझचे शानदार पुनरागमन, बोपण्णा-बालाजी जोडीची विजयी सलामी!

French Open 2025 Updates : गतविजेता कार्लोस अल्काराझने फ्रेंच ओपन पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, अल्काराझने एका सेटच्या पिछाडीवरून पुनरागमन करत हंगेरीच्या फॅबियन मारोझनचा ६-१, ४-६, ६-१, ६-२ असा पराभव केला. दरम्यान, दोन वेळा उपविजेता राहिलेला कॅस्पर रुड दुसऱ्या फेरीत निनो बोर्गेसकडून ६-२, ४-६, १-६, ०-६ असा पराभव पत्करून बाहेर पडला.
बोपण्णा-बालाजी जोडीने मिळवला विजय –
रोहन बोपण्णा आणि एन. श्रीराम बालाजी यांनी त्यांच्या संबंधित जोडीदारांसह पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत विजय नोंदवत प्रवेश केला. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात बोपण्णा आणि त्याचा चेक प्रजासत्ताकचा जोडीदार अॅडम पावलासेक यांनी अमेरिकन जोडी रॉबर्ट कॅश आणि जेजे ट्रेसीचा ७-६, ५-७, ६-१ असा पराभव केला. बालाजी आणि त्याचा मेक्सिकन जोडीदार मिगुएल रेयेस वरेला यांनी चीनच्या युनचाओकेट बु आणि अर्जेंटिनाच्या कॅमिलो उगो काराबेली यांचा फक्त ५१ मिनिटांत ६-२, ६-१ असा पराभव केला.
French Open 25: Alcaraz Survives Early Scare, Ruud , Raducanu crashes out https://t.co/o9UifEW4X8 #FrenchOpen #FrenchOpen2025 #Tennisnews #Tennis #carlosalcaraz #CasperRuud #IgaŚwiatek #EmaRaducanu #grandslam pic.twitter.com/HlxPZBOi2u
— amitava (@amitava0112) May 29, 2025
स्वीएटेकने रॅडुकानूचा केला पराभव –
चार वेळा फ्रेंच ओपन चॅम्पियन पोलंडच्या इगा स्वीएटेकने इंग्लंडच्या एम्मा रॅडुकानूचा ६-१, ६-२ असा पराभव केला. बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने जिल तेचमनचा ६-३, ६-१ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा – LSG vs RCB : जितेश शर्मा खरंच नॉट आऊट होता का? जाणून घ्या काय आहे नियम
नदाल हा सर्वात यशस्वी खेळाडू –
लाल ग्रेव्हलचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदालने फ्रेंच ओपनचे विजेतेपद १४ वेळा जिंकले आहे. नदालने १८ वेळा फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला आहे आणि ११२ सामने जिंकले आहेत आणि त्याला फक्त चार वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे जो कोणत्याही एका ग्रँड स्लॅममधील पुरुष आणि महिला गटात एक जागतिक विक्रम आहे.
हेही वाचा – IPL 2025 Playoffs : चंदीगडच्या रणसंग्रामात कोण मारणार बाजी? जाणून घ्या चारही संघांचा प्लेऑफमधील रेकॉर्ड
फ्रेंच ओपन हा वर्षातील दुसरा ग्रँड स्लॅम –
फ्रेंच ओपन, ज्याला रोलँड गॅरोस म्हणूनही ओळखले जाते, ही पॅरिसमध्ये दरवर्षी आयोजित केली जाणारी एक टेनिस स्पर्धा आहे. ही जगातील चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी एक आहे आणि ती क्ले कोर्टवर खेळली जाते. ही वर्षातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे.





