French Open 2024 (Women’s) : सबालेन्का, रायबाकिना तिसऱ्या फेरीत दाखल….

French Open 2024 (Women’s) : फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेचा उत्साह आता चाहत्यांमध्ये ओसंडून वाहत आहे. ही स्पर्धा पुढील फेरीत जात असल्याने खेळाडूंमधील स्पर्धा अधिकच रोमांचक होत आहे. पॅरिसमध्ये पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी सामन्यांवर परिणाम झाला असला तरी यादरम्यान ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आर्यना सबालेन्का (ArynaSabalenka) स्पर्धेत पुढे जाण्यात यशस्वी ठरली.
महिला एकेरीत आर्यना सबालेन्का हिने जपानच्या क्वालिफायर मोयुका उचिजिमाचा अवघ्या 62 मिनिटांत 6-2, 6-2 असा पराभव करत तिसऱ्या फेरीतील स्थान निश्चित केले. गतवर्षी या ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या सबलेन्काचा पुढचा सामना पाउला बैडोसाशी होईल, जी तिची जवळची मैत्रीण आणि यावर्षी महिला दुहेरीत तिची जोडीदार आहे.
French Open 2024 : इगा स्विटेकची तिसऱ्या फेरीत धडक; नाओमी ओसाकावर संघर्षपूर्ण विजय…
दुसरीकडे याच स्पर्धेत 2022 ची विम्बल्डन चॅम्पियन आणि चौथी मानांकित एलिना रायबाकिना (ElenaRybakina) हिने अरांटेक्सा रुस हिचा 6-3, 6-4 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली.





