French Open 2024 : कार्लोस अल्काराजने पटकावलं विजेतेपद, अटीतटीच्या सामन्यात अलेक्झांडरचा केला पराभव…

French Open 2024 :- स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराझ गार्फिया याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेववर मात केली. यासह यंदाच्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेला नवा विजेता मिळाला.
हा सामना सुरु झाला तेव्हा गार्फियाच वर्चस्व राखणार असे म्हटले जात होते. प्रत्यक्ष सामन्यातही तसेच घडले. पहिला सेट गार्फियाने ६-३ असा जिंकताना आश्वासक सुरुवात केली. मात्र, दुसरा सेट सुरु झाला तेव्हा ज्वेरेवनेही आपला खेळ उंचावला. त्याने हा सेट ६-२ असा पटकावताना सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.
तिसरा सेट सुरू झाला तसा ज्वेरेवचा खेळ आणखी उंचावला व त्याने ७-५ असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये गार्फियाने ज्वेरेवला कोणतीही संधी दिली नाही व त्याच्या सर्व्हिसही भेदत आपले दडपण वाढवले. त्याने हा सेट ६-१ असा सहज जिंकला. पाचव्या व अखेरच्या सेटमध्ये ज्वेरेव काहीसा थकलेला दिसला. त्याच्या सर्व्हिसही योग्य होत नव्हत्या. त्याचा लाभ गार्फियाने वेळेवर उचलला व आपले वर्चस्व प्रस्थापित करत हा सेट ६-२ असा जिंकत विजेतेपदही पटकावले.
French Open 2024 : ‘गॉफ-सिनियाकोव्हा’नं पटकावले महिला दुहेरीचे विजेतेपद…
महिला दुहेरीत गॉफ व सिनियाकोव्हा विजेत्या
या स्पर्धेत महिलांच्या दुहेरीच्या लढतीत अमेरिकेच्या कोको गॉफने चेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सानियाकोव्हा हिच्यासह खेळताना अंतिम सामन्यात जस्मिन पाओलिनी व सारा एरानी . इटलीच्या जोडीचा ७-६, ६-३ असा पराभव केला व विजेतेपदाचा करंडक उंचावला.





